मुरुडच्या कबड्डी स्पर्धेत शिवलिंग संघाची बाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

मुरूड : येथील जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत वाळवटी येथील शिवलिंग संघाने विजेतेपद पटकाविले.
उद्‌घाटन पोलिस निरीक्षक रंगराव पवार यांनी केले.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन ॲड. मोहन तांबडकर, उपाध्यक्ष दिलीप जोशी, कबड्डी स्पर्धेचे प्रमुख बाळकृष्ण कासार, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, पंचक्रोशी कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी मोहन पाटील, सचिन पाटील, नितीन वारगे, नंदकुमार ठाकूर, संदीप कमाने मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत मुरूड तालुक्‍यातील ३२ संघांनी सहभाग नोंदवला. प्रथम कमांक शिवलिंग संघ वाळवटी, द्वितीय क्रंमांक वादळ संघ खारीकवाडा, तृतीय क्रमांक जय हनुमान संघ खार अंबोली यांनी पटकाविला. सर्वोकृष्ट खेळाडूचा मान मयुर घरत, उत्कृष्ट चढाईसाठी ओमकार मेस्री यांनी मिळविला. या वेळी सर्व विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News