बदनामपुरात दणक्यात शिवजन्मोत्सव साजरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

निर्मल क्रीडा व समाजप्रबोधन ट्रस्टच्या राज्यपातळीवर सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या कबड्डी संघाचा गौरव करण्यात आला​. 

बदनापूर : छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा आणि शाहिरीतून शिवराय अशा संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून बदनापूर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी  शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

येथील निर्मल क्रीडा व समाजप्रबोधन ट्रस्ट संचलित णिज्य महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त गुरुवारी दुपारी शाहीर विजय काटे प्रस्तुत ‘शाहिरी शिवदर्शन’ आणि कुणाल वराळे यांचा ‘संगीतमय शिवगौरव गाथा’ झाला. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, डॉ. विजय पाथ्रीकर,  प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर, डॉ. माणिक राठोड, पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, क्रीडा विभागप्रमुख डॉ. एस. एस. शेख, प्रा. डॉ. नाजमा खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय जऱ्हाड आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरवात जिजाऊ वंदना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरतीने झाली. कार्यक्रमात युगपुरुष शिवगौरव गाथा या कुणाल वराडे दिग्दर्शित व संचलित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या पराक्रमाची शौर्यगीते सादर करण्यात आली. यात ‘शिवरायांची तलवार’, ‘माय भवानी’ आणि शेवटी सादर केलेल्या ‘महाराष्ट्र गीताला’ उपस्थित प्रेक्षकांनी घोषणा देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवशाहीर विजय काटे यांनी डफ आणि खंजिरीचा ठेका धरत ‘शाहिरी शिवदर्शन’ कार्यक्रमातून छत्रपतींच्या जन्मापासून ते थेट राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग सादर केले.  

यावेळी निर्मल क्रीडा व समाजप्रबोधन ट्रस्टच्या राज्यपातळीवर सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या कबड्डी संघाचा गौरव करण्यात आले. यावेळी सर्व खेळाडूंना महाविद्यालयाच्या वतीने स्मृतिचिन्ह आणि जर्सी भेट देण्यात आली.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News