'सातारचा सलमान'ची हिरोईन बनली शिवानी सुर्वे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 September 2019

हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी  प्रदर्शित होणार आहे.  प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती की, या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये कोणती अभिनेत्री असेल?

सुरुवातीला 'देवयानी' व त्यांनतर 'बिगबॉस' मधून प्रत्येकाच्या घरो-घरी पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच शिवानी सुर्वे. बिगबॉस नंतर शिवानी आता 'सातारचा सलमान' या मराठी चित्रपटात लवकरच झळकणार आहे.या चित्रपटात सायली संजीव आणि शिवानी ह्या दोघी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

अभिनेता सुयोग गोऱ्हे देखील या चित्रपटामध्ये कार्यरत आहे. 'सातारचा सलमान' या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी  प्रदर्शित होणार आहे.  प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती की, या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये कोणती अभिनेत्री असेल? आता त्यांची उत्सुकता संपली असून शिवानीसोबतच सायलीदेखील चित्रपटात असल्याचे समोर आले आहे. नुकतेच या दोघींचे पोस्टर संपूर्ण सोशल मीडियावर झळकत आहेत.  प्रेक्षकांकडून या चित्रपटाच्या टिझरला भरभरून प्रतिसाद देखील दिला आहे.

'सातारचा सलमान' मध्ये शिवानी 'दीपिका भोसले' या बिनधास्त, बोल्ड मुलीची भूमिका साकारते तर...  सायली 'माधुरी माने' या सोज्वळ आणि निरागस मुलीची भूमिका पार पाडते. यात अभिनेता सुयोगची नायिका नेमकी कोण असेल? हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.       
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News