शिवाजी विद्यापीठाचे संकेतस्थळ डाऊन; मध्यरात्री भरावा लागतो विद्यार्थ्यांना अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 June 2020

विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांनी अनेक वेळा तक्रार केली मात्र, तक्रारीवर कोणतीच कारवाई विद्यापीठाने केली नाही.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात यंदा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे ऑनलाईन प्रवेश अर्ज सुरू झाले. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यामुळे विद्यापीठाचे संकेतस्थळ वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मध्यरात्री आणि भल्यापाहाटे फॉर्म भरावा लागतो. फार्म भरल्यानंतर अर्जाची फी ऑनलाईन भरायची आहे. परंतु, फी भरल्यानंतर त्याची ऑनलाईन पावती मिळत नाही. विद्यापीठाचे संकेतस्थळात अनेक त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठांनी सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली. त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना विद्यापीठात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही बचत होतो. मात्र शिवाजी विद्यापीठाचे संकेतस्थळ डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक आडचनींचा सामान करावा लागत आहे. विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांनी अनेक वेळा तक्रार केली मात्र, तक्रारीवर कोणतीच कारवाई विद्यापीठाने केली नाही. विद्यापीठाने वेळीच संकेतस्थळ दुरुस्त केले नाही तर विद्यापीठ प्रशासन विरोधात विद्यार्थ्यांमध्ये एक रोष निर्माण होईल अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.   

गेली 10 दिवस खूप वेळा कोल्हापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. परंतु संकेतस्थळ सुरळीत चालत नाही. चालू झालतं तर पुढे काही प्रोसेस केल्यावर लगेच बंद पडते. 
- उन्नती टिपे, विद्यार्थिनी

कोल्हापूर विद्यापीठाची प्रवेश परीक्षा अर्ज भरताना खूप अडथळे येत आहेत. सारखी वेबसाईट डाऊन होत असल्याने गेले काही दिवस मी फॉर्म सबमिट करू शकले नाही.
- अवंती कारंडे, विद्यार्थिनी

वेबसाईट सतत डाऊन असल्यामुळे कोल्हापूर विद्यापीठाचा प्रवेश परीक्षा अर्ज भरू शकलो नाही. विद्यापीठाने यावर त्वरित उपाययोजना करावी. आणि फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी.
-रमाकांत मोहिते, विद्यार्थी वैराग

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News