शिवाजी महाराज अष्टप्रधान मंडळींना दयायचे तब्बल इतका पगार...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
 • शिवाजी महाराजांनी केव्हाही प्रजेवर अन्याय होऊ दिला नाही.
 • घरचे असो किंवा स्वराज्याची प्रजा सर्वाना समान कायदा अमलात आणला जायचा.
 • गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात कोण आहे याचा विचार महाराज केव्हाही करत नव्हते.
 • जे लोक स्वराज्यामध्ये काम करायचे त्यांना योग्य तो मोबदला दिला जायचा. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होण्यापूर्वीच्या काळात वतनदारी पद्धत अस्तित्वात होती. परकीय सत्ताधीशांच्या राज्याचे संरक्षण, लढाया किंवा राज्यविस्तारासाठी आपली लष्करी ताकत वापरण्याच्या अटीवर परकीय सत्ताधीश सरदारांना वतने देत. यामध्ये बहुतांश वेळा मर्जीतल्या किंवा नातेवाईकांनाच वतनदारी मिळायची. छत्रपती शिवरायांनी वतनदारी बंद करून वेतनदारी चालू केली. महाराजांच्या राज्येभिषेकावेळी मंत्री मंडळ निवडले गेले होते. या मंत्री मंडळामध्ये अनेक मंत्री असायचे त्यांची कामे त्यांच्यावर सोपवली जायची. मंत्रिमंडळाला स्वराज्याचे एक चाक म्हणले जायचे. संपूर्ण स्वराज्याचा गाडा हाकण्याचं काम हे महाराजांसोबत मंत्रिमंडळावर सुद्धा असायचे. 

शिवाजी महाराजांनी केव्हाही प्रजेवर अन्याय होऊ दिला नाही. घरचे असो किंवा स्वराज्याची प्रजा सर्वाना समान कायदा अमलात आणला जायचा. गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात कोण आहे याचा विचार महाराज केव्हाही करत नव्हते. जे लोक स्वराज्यामध्ये काम करायचे त्यांना योग्य तो मोबदला दिला जायचा. 
तर जाणून घेऊया कि आताचे पैसे आणि शिवरायांचे होन यामधला फरक...  

छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्याभिषेकावेळी होन हे स्वराज्याचे सुवर्ण चलन सुरु केले. त्यावेळच्या एका होनाचे वजन साधारणपणे २.७ ग्रॅम असायचे. आजच्या हिशेबाने बोलायचे झाले तर (१ ग्रॅम सोन्याचा आजचा दर ३२५० x २.७ = ८७७५) म्हणजेच शिवरायांच्या एका होन नाण्याचे आजचे मूल्य ८७७५ रुपये इतके आहे.

तर पाहूया कि शिवरायांनी आपल्या अष्टप्रधान मंडळातील अधिकाऱ्यांना किती पगार दिला... 

महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना इतका वार्षिक पगार दिला की, त्या मंत्र्यांना वतनाची गरज पडणार नाही. पाहूया महाराजांनी आपल्या मंत्र्यांना वार्षिक किती पॅकेज दिले. 

 • पेशवा 
  पेशवा हा मंत्रिमंडळातील मह्त्वाचा घटक होते. त्यांना सर्वात जास्त वेतन दिले जायचे. १५००० होन म्हणजेच १३ कोटी १६ लाख २५ हजार रुपये. 
 • अमात्य
  १२००० होन म्हणजेच १० कोटी ५३ लाख रुपये. 
 • सचिव
  १०००० होन म्हणजेच ८ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये.
 • वाकनीस  
  १०००० होन म्हणजेच ८ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये. 
 •  सेनापती १०००० होन म्हणजेच ८ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये. 
 •  न्यायाधीश
  १०००० होन म्हणजेच ८ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये.  
 • पंडितराव
  १०००० होन म्हणजेच ८ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये. इतका प्रचंड पगार महाराजांनी आपल्या मंत्रिमंडळालाच नव्हे तर साध्या शिपायापासून सर्वांनाच दिला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News