शिवबा आमचे विठ्ठल रायगड ही पंढरी...

शिवशाहीर, सुनिल पवार
Thursday, 2 May 2019

शिवबा आमचे विठ्ठल रायगड ही पंढरी...
शिवभक्त आम्ही मावळे शिवबाचे वारकरी...

हर हर महादेव ही आमची एक ललकारी,
एक एक मावळा मराठी हा लाखांना भारी...
नजरेला भिडवितो आम्ही नजर आमची करारी,
सह्याद्रीच्या कड्याकपारी घेतो उंच भरारी...
शिवबा आमचा विठ्ठल अन् रायगड ही पंढरी...

शिवसिंहाची गर्जना अन् नरव्याघ्राची डरकाळी,
देव देश अन् धर्मासाठी मरण लिहिले कपाळी...
महाराष्ट्र हा बाप आमुचा आई माती काळी,
पुरून उरुती मरणाला माणसे मराठमोळी...
शिवबा आमचा विठ्ठल अन रायगड ही पंढरी...

शिवबा आमचे विठ्ठल रायगड ही पंढरी...
शिवभक्त आम्ही मावळे शिवबाचे वारकरी...

हर हर महादेव ही आमची एक ललकारी,
एक एक मावळा मराठी हा लाखांना भारी...
नजरेला भिडवितो आम्ही नजर आमची करारी,
सह्याद्रीच्या कड्याकपारी घेतो उंच भरारी...
शिवबा आमचा विठ्ठल अन् रायगड ही पंढरी...

शिवसिंहाची गर्जना अन् नरव्याघ्राची डरकाळी,
देव देश अन् धर्मासाठी मरण लिहिले कपाळी...
महाराष्ट्र हा बाप आमुचा आई माती काळी,
पुरून उरुती मरणाला माणसे मराठमोळी...
शिवबा आमचा विठ्ठल अन रायगड ही पंढरी...

रक्ताचा अभिषेक शंभूला अंबेला गोंधळी,
गोंधले आम्ही शिवरायांचे नाव आमच्या भाळी...
एक करी ध्वज भगवा दुज करी तलवारी,
मुक्त करू गुलामीतून आम्ही मातृभूमी ही सारी...
शिवबा आमचा विठ्ठल अन् रायगड ही पंढरी...

गडा गडावर कड्या कपारी राबवू गडकोट मोहीम,
शिवबाच्या शिवकाऱ्यासाठी घेऊ जीवाला जोखीम...
ठासून लेखणी या शिवचरणी अर्पू नवी शाहिरी,
इतिहासाची लिहू कहाणी नवी या शिवमंदिरी...
शिवबा आमचा विठ्ठल अन् रायगड ही पंढरी...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News