डीजे संस्कृतीला फाटा देत युवा महाराष्ट्र समूहाची 'वैचारिक शिवजयंती'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

समूहातील काही मुलांनी किल्ले शिवनेरी येथून पायी शिवज्योत आणली. कार्यक्रमाची सुरुवात पालखी मिरवणुकीने करण्यात आली

पिंपरी : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील डीजे संस्कृतीला फाटा देत डॉ. डि वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी येथील युवा महाराष्ट्र समूहाने 'वैचारिक शिवजयंती' साजरा केली. युवा महाराष्ट्र च्या वतीने रॉयल इंफिल्ड व ढोणे ऑटोमोबाईल प्रस्तुत शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  सुमारे १००० ते १२०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आचार्य अत्रे रंगमंदिर येथे हा पार पडला. युवा महाराष्ट्र समूह हा नेहमीच व्यक्तीपुजनापेक्षा त्या व्यक्तीच्या विचारांना प्राधान्य देत आले आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. यावर्षी शिवजयंती सोहळ्याचे निमित्त साधुन रणधुरंधर महानाट्याद्वारे संभाजीराजांचा इतिहास आणि शिवविचार लोकांसमोर मांडला. 

समूहातील काही मुलांनी किल्ले शिवनेरी येथून पायी शिवज्योत आणली. कार्यक्रमाची सुरुवात पालखी मिरवणुकीने करण्यात आली. गणराज वाद्यपथकाने पालखीसमोर सुरेख वादन केले. भरपूर गर्दी असूनदेखील मुलांनी शिस्तबद्धरितीने मिरवणूक पार पाडली.

संभाजी राजांबद्दल बराच चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला आहे पण तो पुसून खरा इतिहास लोकांपुढे आणायचं काम युवा महाराष्ट्रने केले आहे असे प्रतिपादन त्यांनी कार्यक्रमात केले. विद्यालयाचे संचालक पी. डि. पाटिल साहेब यांनी देखील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. मुलांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता आजही मुले आपल्या संस्कृतीशी एकनिष्ठ आहेत हे या कार्यक्रमातून दिसून येते. मराठमोळ्या पेहेरावात उपस्थित असलेल्या युवक-युवतींमुळे सारे वातावरण शिवमय अन मराठीमय झाले होते. आजचे तरुण हे फक्त डीजे लावूनच शिवजयंती साजरा करतात असे अजिबात नाही हे या कार्यक्रमाने सर्वांना दाखवून दिले. 

या सोहळ्यास प्रमोद कल्लाप्पा मोर्ती (शिवकालीन घटनांचे चित्रकार) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सोबतच शिक्षक प्रतिनिधी गणेश पाटिल, मुकेश घोगरे, शेंडे सर आणि शिक्षक मान्यवर आणि पालक उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News