ऋतूनुसार बदलता पेहराव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 13 March 2020

सिलाई’ ग्राहकांसाठी खास स्पोटर्स वेअरही घेऊन येत आहे. कोणकोणते सेल आणि कोणत्या प्रकारचे कलेक्शन उपलब्ध आहेत, हे आपण जाणून घेऊयात. 

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उकाड्यामुळे हा सीझन नावडता असला, तरी फॅशन आणि लग्नसमारंभांमुळे तितकाच हॅपनिंग आहे. अशातच पुण्यातील प्रसिद्ध सिलाई शोरुममध्ये जबरदस्त सेल सुरू आहे. सेलव्यतिरिक्त सिलाईमध्ये उन्हाळ्यासाठीचे खास कलेक्शन आले आहे. यामध्ये कुर्ता, कॅज्युअल्स आणि लहान मुलांचे भन्नाट कलेक्शन उपलब्ध आहे. एथनिक, फॉर्मल, कॅज्युअल, कुर्ती, साडी, लहान मुलांचे कपडे आणि अॅक्सेसरीज यामध्ये भरपूर प्रकारही आहेत. उन्हाळ्याला साजेसे असे कॅज्युअल वेअरमध्ये जीन्स, टॉप, कुर्तीज, प्रिंटेड शर्ट आणि लहान मुलांचे कपडेही उपलब्ध आहेत. ‘सिलाई’ ग्राहकांसाठी खास स्पोटर्स वेअरही घेऊन येत आहे. कोणकोणते सेल आणि कोणत्या प्रकारचे कलेक्शन उपलब्ध आहेत, हे आपण जाणून घेऊयात. 

मुलींचे वेस्टन वेअर
वेस्टन आणि कॅज्युअल वेअरमध्ये अनेक नवनवीन प्रकार आहेत. मुलींसाठी जीन्स आणि टॉपची विविधता आहे. खास करून टॉपमध्ये उन्हाळ्याला साजेसे रंगांचे टी-शर्ट, शर्ट, जॅकेट, इंडो वेस्टन प्रिंटेड टॉप, फुल स्लिव्ह, हाफ स्लिव्ह आणि स्लिव्हलेस टॉप्स या कलेक्शनमध्ये आहेत. अनेक टाइपचे रोजच्या वापराचे जॅकेट, शोल्डर नेटेड टॉप्सचे भन्नाट कलेक्शन आहे. शिवाय वेगवेगळ्या सॉलिड रंगांचे आणि प्रिंटेड प्लाझोही लक्ष वेधतात. मुलींमध्ये सध्या स्ट्रेट पॅंटला जास्त मागणी आहे. अनेक ठिकाणी स्ट्रेट पॅन्ट फक्त पांढऱ्या, काळ्या आणि ऑफ व्हाइट रंगांमध्येच उपलब्ध आहेत. पण, सिलाईत लाल, पिवळे, केशरी आणि अशा अनेक रंगांत पॅन्ट आहेत. 

लहान मुलांसाठी विविधता 
लहान मुलींसाठी लॉंग आणि शॉर्ट टॉप्स, फ्रॉक, लाइनिंगचे टॉप, हॅंड फ्रिलचे टॉप, टी-शर्ट, स्कर्ट अशी विविधता आहे. मुलांसाठी चेक्सचे शर्ट, प्लेन शर्ट, टी-शर्ट हे उपलब्ध आहे. हे कॉम्बो म्हणूनही घालता येईल. 

कुर्ता
कुर्त्यामध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत. त्यामध्ये पायापर्यंतचे, तसेच लहान साइजमधील कुर्तीज आहेत. सध्याच्या ट्रेंडनुसार जॅकेटच्या कुर्तीजही पाहायला मिळतात. रोजच्या वापरासाठी कुर्त्यांमध्ये भरपूर पर्याय आहेतच, त्याशिवाय फॅशनेबल, व्हायब्रंट रंगांचे प्रकार उपलब्ध आहेत. काळानुसार कुर्तीमध्ये इंडो-वेस्टन प्रकार आले आहेत. अशा कुर्ती तुम्ही कार्यक्रमांमध्ये आणि इतर दिवशीही घालू शकता. उन्हाळ्याचा विचार करता कुर्त्यांमध्ये गडद रंगाचे कलेक्शन पाहायला मिळते. 

मुलांचे कॅज्युअल्स 
मुलांच्या कलेक्शनसाठीही भरपूर व्हारायटी आहेत. रंग आणि कॉलर टाइपमध्येही विविधता पाहायला मिळते. त्याचसोबत ऑफिस आणि काही कार्यक्रमांसाठी लागणारे फॉर्मल वेअरमध्ये शर्ट पाहायला मिळतात. सर्व कलेक्शनमध्ये उन्हाळ्याचा विचार करता तसे रंग, मटेरिअल आणि पॅटर्न आहेत. रोजच्या वापरासाठीचे जीन्सवरील शॉर्ट कुर्तेही उपलब्ध आहेत. हे शॉर्ट कुर्ते रोजच्या फॅशनमध्येही एक हटके लुक देतील
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News