सोशल मीडियावर 'ती'ची नजर करतेय सर्वांना घायाळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020
  • काजळाने भरलेले डोळे,नजरेतुन निघणारी दाहकता, आणि चेहऱ्यावरील ते निखळ सौन्दर्य सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकवत आहे. पण ही सौन्दर्यवती आहे तरी कोण?

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटी हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्यामोठ्या घडामोडी त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामध्ये प्रोफेशनल लाईफ असो की मग पर्सनल लाईफ असो याबाबत ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. याच सेलिब्रिटींचे सोशल मीडियावर अनेक फोटो,व्हिडिओ शेअर होत असतात आणि चाहते त्यावर आपली पसंती दर्शवतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वाना आकर्षित करत आहे. 

या फोटोतील एका नजरेच्या कटाक्षाने सर्वांनाच घायाळ केलं आहे.  काजळाने भरलेले डोळे,नजरेतुन निघणारी दाहकता, आणि चेहऱ्यावरील ते निखळ सौन्दर्य सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकवत आहे. पण ही सौन्दर्यवती आहे तरी कोण? असा प्रश्न या फोटोला पाहून पडतो. तर ही सौदर्यवती दुसरी कोणी नसून अभिनेत्री रिचा चड्डा आहे. नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून रिचा चड्डाची ओळख आहे. नुकताच प्रदर्शित झालेला कंगनाचा 'पंगा' या चित्रपटातही रिचा चड्डाची भूमिका ही कौतुकास्पद होती. अशीच एक आव्हानात्मक भूमिका घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि त्याच आगामी चित्रपटाला तिच्या लूकची झलक रिचाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. 

यामध्ये रिचाचा लुक हा हटके असून सर्वाना आकर्षित करत आहे. एकंदरीतच या फोटोवरून आगामी चित्रपटातील तिची भूमिका ही अवहनात्मक असणार यात शंका नाही पण ती काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News