माझ्यातील ती

सुनिल पवार
Friday, 2 August 2019

कधी नव्हे ते आज,
ती म्हणाली,
किती सहज सुचत तुला
कसं जमतं हे तुला..

कधी नव्हे ते आज,
ती म्हणाली,
किती सहज सुचत तुला
कसं जमतं हे तुला..
तडाडल्या भुईला
हळुवारपणे सांधायला..!!

हसलो मी उत्तरलो,
ही तर खरी तुझीच किमया
तू घेते जुळवून
म्हणूनच आवडते जुळवायला..
हळुवारपणा खरा,
तुझ्या हृदयात मुरलेला
मी तर केवळ,
ओलावा दिला तुला..!!

ती गहिवरली, म्हणाली,
इतकेच तर असते,
अपेक्षित जगण्याला..
आणखी काय लागते रे,
नंदनवन फुलायला..?
पण कुणीतरी असावं लागतं
पाऊस व्हायला..!!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News