नववर्षानिमित्त गड किल्ले सर करण्याची 'ती'ची मोहीम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 January 2020
  • पुण्यातील एका चार वर्षाच्या चिमुकलीने लिंगाणा सर केला आहे. ही चिमुकली सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे.

पुण्यातील एका चार वर्षाच्या चिमुकलीने लिंगाणा सर केला आहे. ही चिमुकली सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे. लिंगाण्याची ख्याती अशी पसरलेली आहे की, सरळ आकाशात गेलेला काळया कातळाचा हजार फुटांचा सुळका आहे. सह्याद्रीच्या रांगांतला हा सुळका चढाईला सर्वात अवघड असून पुण्यातल्या या चिमुरडीनं मात्र लिंगाण्यावर यशस्वी चढाई केली आहे.

सह्याद्री महेश भुजबळ असं या ४ वर्षाच्या मुलीचं नाव आहे. भर उन्हात लिंगाणा सर करून तिनं  धाडसानं आणि हिमतीनं लिंगाण्यावर झेंडा फडकावलाय. लिंगाण्याची चढाई सह्याद्रीत सर्वात कठीण आहे. मात्र सह्याद्रीने हे आव्हान स्वीकारलं आणि तो सरही करून दाखवला. वडिलांमुळे सह्याद्रीला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. आणि त्यांच्याबरोबरच तिनं ट्रेकिंगला सुरवात केली. या मोहिमांमधून सह्याद्रीच्या  गिर्यारोहण आणि प्रस्तारोहणातला आवाका लक्षात आलाच होता. त्यामुळं त्यांनी पुढच्या चढाईसाठी निवड केली ती लिंगाण्याची. 

आत्तापर्यंत तिने रायगड 3 वेळा सर केलाय. तर पुरंदर,लोहगड,सिंहगड,तुंग,हडसर,शिवनेरी,जंजिरा,सुधागड,पन्हाळा,मल्हारगड, पन्हाळा पावनखिंड, राजमाची तोरणा आणि राजगड हे अवघड समजले जाणारे किल्लेही तिनं सर केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News