शेतात रोवण करित होती... मिळाली यशाची बातमी

संदीप रायपूरे
Saturday, 18 July 2020

आक्सापूरातील मयुरी टेकाम; शेतमजूर आईवडिलांना मदतीचा हात देत मिळविले यश

गोंडपिपरी: ती रोवायला शेतात गेलेली. अन् घरी अचानक महाविद्यालयातून फोन आला. मुलीबाबत विचारणा झाली. घरच्यांना वाटल काय झाल. प्राचार्यानी सांगितल तुमची मुलगी महाविद्यालयात पहिली आली. अन् सारेच अवाक राहिले. शेतमजूर आईवडिलांच्या खांद्याला खांदा देणा-या मुलीन शिक्षणातही बाजी मारल्याची बातमी ऐकून त्यांनाही भरून आलं. तिच्या यशाची गावासह शेतीच्या बांध्यावर चर्चा सुरू आहे.

आक्सापूरातील गोविंदा टेकाम अल्पभुधारक शेतकरी आहेत. आपल्या शेताच्या तुकड्यात भागत नाही म्हणून ते इतरांच्या शेतात मजूरी करतात. त्यांची पत्नी अरूणा व मुलगी मयुरी याही त्यांच्या खांदयाला खांदा लावून शेतात काम करतात. यावरच टेकाम कुटुंबीय आपली गुजरान करतो. मयुरी येथील लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्याालयात बारावीचे शिक्षण घेत होती. यंदा तिने कुटुंबाला मदतीचा हात देत अभ्यासही केला अन् बारावीची परिक्षा दिली. यंदा कोरोनाच संकट आल. अन् सारच थांबल. सध्या धानाच्या रोवणीचा हंगाम आहे. ग्रामीण भागात हा हंगाम जवळपास दिड महिना चालतो. याच कामावर मयुरी जात आहे. काल अनपेक्षितपणे बारावीचा निकाल जाहिर करण्यात आला. मयुरी शेताच्या बांध्यावर रोवायला गेलेली. घरी काही आप्तजण होते. अचानकपणे घरचा भ्रमणध्वनी वाजला. तो महविद्यालयातून आलेला होता. भ्रमणध्वनीवरून प्राचार्य प्रदीप बाम्हणकर यांनी मयुरीबाबत विचारणा केली. घरच्याना वाटल काय झाल. पण नंतर मयुरी बारावीच्या परिक्षेत कुंदोजवार महाविद्यालयातून प्रथम आल्याची माहिती त्यांनी दिली. 

कला शाखेतून तिने 78 टक्के गुण प्राप्त केल्याचे सांगितले. अन् सारेच अवाक राहिले. आपल्या शेतमजुर आईवडिलांच्या खांदयाला खांदा मिळवून अभ्यासातही बाजी मारणा-या मयुरीच्या कामगिरीने गावक-यांनाही भरून आलं. एका आदिवासी कुटुंबातील मयुरीच्या यशाची चर्चा आज दिवसभर आक्सापूरातील शेताच्या बांध्यावर रंगल्या होत्या. रोवणी करतांना तिचे अभिनंदन अन कौतूकही केले. आपणास अजुन खुप शिकायचे आहे. तिचा लहान भाऊ नववीत शिकतो. त्यालाही घडवायच तिच्या मनात आहे. शेतमजूरीचे काम करून परिक्षेत बाजी मारणा-या मयुरीच हे यश दुस-या अर्थाने खुप काही सांगून जाते.

 

आक्सापूर येथील मयुरी टेकाम या विद्यार्थिनीने महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकविला. एका शेतमजूर कुटुंबातील मयुरीने कुटुंबाला मदतीचा हात देत मिळविलेल यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल आहे. ग्रामीण भागात गुणवत्तेला कमी नाही हे मयुरीन दाखवून दिल. सर्वस्तरातून आज तिच कौतुक होत आहे.
 - प्रदीप बाम्हणकर,  प्राचार्य, स्व. लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ट महाविद्यालय, गोंडपिपरी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News