मुलाला कडेवर घेऊन 'तिने' बजावले कर्तव्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

प्रीती राणी असे या कॉन्स्टेबलचे नाव असून, त्या सकाळी सहा वाजल्यापासून कर्तव्यावर हजर होत्या. मुख्यमंत्री आदित्यनाथ हेआज सकाळी येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटनाला येणार असल्याने सुरक्षेसाठी पहाटेपासूनच पोलिस तैनात होते. या ठिकाणी प्रीती राणी यांनाही सुरक्षेसाठी हजर राहण्याचे आदेश होते.

नोएडा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमाला आपल्या दीड वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन कर्तव्य बजावलेली एक महिला कॉन्स्टेबल चर्चेचा विषय ठरली. प्रीती राणी असे या कॉन्स्टेबलचे नाव असून, त्या सकाळी सहा वाजल्यापासून कर्तव्यावर हजर होत्या.

मुख्यमंत्री आदित्यनाथ हेआज सकाळी येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटनाला येणार असल्याने सुरक्षेसाठी पहाटेपासूनच पोलिस तैनात होते. या ठिकाणी प्रीती राणी यांनाही सुरक्षेसाठी हजर राहण्याचे आदेश होते.

प्रीती राणी यांच्या पतीला आज एका परीक्षेसाठी जायचे असल्याने बाळाला सांभाळण्यासाठी घरी कोणीही नव्हते. बाळाच्या जबाबदारीबरोबरच पोलिस म्हणून असलेले कर्तव्यही महत्त्वाचे असल्याने प्रीती राणी या बाळाला घेऊनच कर्तव्यावर हजर झाल्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News