ती अजूनही रडत असेल

सायली कदम
Thursday, 2 May 2019

जेव्हा पण ति कोणाकडून दुखावली जात असेल...
तेव्हा तिला माझी 
आठवण येतच असेल...

लपून लपून कुठे तरी 
पोस्ट माझी वाचत असेल...
माझ्या फोटोशी
एकटेपणात भांडत असेल...
जेव्हा माझी आठवण 
तिला येत असेल...
वाटत आहे अजून
पण ती रडत असेल...

कुठल्यातरी दुसऱ्या नावाने 
फेसबुकवर आली तर असेलच
ID एखादी फेक नक्कीच
बनवली असेल...
कोणी माझ्यात कमी काढली 
तर चिडत असेल...
वाटत आहे अजून
पण ति रडत असेल...

माझा प्रत्येक अपडेट तिला
आता पण छेडत असेल...
माझा चेहरा तिच्यासमोर 
येताच असेल...
जेव्हा पण ति कोणाकडून दुखावली जात असेल...
तेव्हा तिला माझी 
आठवण येतच असेल...
वाटत आहे अजून
पण ति रडत असेल...

लागली आहे सवय माझ्या कवितांची अशी सुटेल कशी...
घाबरत घाबरत रिक्वेस्ट
मला पाठवली असेल...
उगाच सोडल तुला असं बोलून
स्वतःशीच भांडत असेल...
वाटत आहे अजून
पण ति रडत असेल...

खरच परत मिळावा तो
मला येवून त्याच्या प्रेमाच्या 
गोष्टी कराव्या त्याने पुन्हा
हाच विचार करून मंदिरात
रोज माथा टेकत असेल...
वाटत आहे अजून 
पण ति रडत असेल...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News