मुलगी आहे ती आमची...

दिव्या रांका
Monday, 28 September 2020

सूर्य जरी नसली, चांदणी तरी असेल ती, जन्माने ओ तिच्या चाहुल लागेल सुखाची

मुलगी आहे ती आमची...

 

उमलण्या आधीच कळी ती मोडू नका,

जन्म घेण्या आधीच दोर आयुष्याची तोडू नका

दिवा जरी नसली पणती तरी बनेल ती,

सूर्य जरी नसली, चांदणी तरी असेल ती.

जन्माने ओ तिच्या चाहुल लागेल सुखाची,

शिक्षणाने आपल्या दूर करेन संकटे दुःखाची

अट्टाहास नसेल तिचा हवा मला बंगला अन् गाडी,

प्रेम, माया अन् सासरला जाताना हवी तीला फक्त माहेरची ओ साडी

म्हातारपणी ओ तुमच्या सेवे खातर,

फक्त अन् फक्त असेन तीच सदैव तत्पर

ती दुसरी कोणी नसुन मुलगी आहे तुमची,

ओळख तिची ती नसुन

फक्त गर्वाने एकदा म्हणा

'मुलगी आहे ती आमची'!

 

- दिव्या रांका

टीवाय, बीसीए सायन्स, एच व्ही देसाई महाविद्यालय, पुणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News