चहा विकून तिने कमावले कोट्यवधी रुपये 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020
  • ब्रुक एडी असं या तरुणीचं नाव असून ती अमेरिकेत राहते. एका कार्यक्रमासाठी ती २००२ साली भारतात आली होती.

चहा हे असे लोकप्रिय पेय आहे, की जे जगभर प्रसिद्ध आहे. भारतात तर चहाला नकार देणारे कमीच..! चहाच्या व्यवसायावर नवं उदाहरणे करणारे अनेकजण पहिले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चहा विकण्यापासूनच सुरुवात केली होती. या चहाच्या जोरावर एक महिला चक्क कोट्यधीश झाली आहे. 

ब्रुक एडी असं या तरुणीचं नाव असून ती अमेरिकेत राहते. एका कार्यक्रमासाठी ती २००२ साली भारतात आली होती. या प्रवासादरम्यान तिने अनेक ठिकाणी चहाचा आस्वाद घेतला होता. त्यावेळी प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या चहाची वेगळी चव लक्षात आली. या अनुभवामुळे ती खूपच प्रेरित झाली. आपण देखील याचप्रमाणे चहा तयार केला तर आपल्या देशात नक्कीच पसंती मिळेल, असं तिला वाटलं.  

 

भारतातून अमेरिकेत परतल्यावर तिने कोलोरॅडोमध्ये स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरु केला. भारतात एकंदरीत चहाची चव आणि अमेरिकेत मिळणाऱ्या चहाची चव यामध्ये खूपच फरक असल्याचं तिला जाणवलं. तिने त्या प्रकारे चहा बनविण्यास सुरुवात केली. 

सुरुवातीला आपल्या कारच्या डिक्कीत तिने चहाच्या विक्रीला सुरुवात केली. एक नवं स्टार्टअप करण्यासाठी तिने हे सुरु केलं. याला तिने 'भक्ती चाय' असं नाव दिले. या भारतीय नावामुळे आणि भारतीय पद्धतीच्या चहामुळे तिला आजूबाजूच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. अनेकांना भक्ती चहा आवडू लागला. २००७ मध्ये ब्रुकने आपली नोकरी सोडून 'भक्ती चाय' ची वाट धरली. यातून तिने पुढे एक वेबसाईट देखील सुरु केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Spice up your weekend 

A post shared by Bhakti Chai (@drinkbhakti) on

 
या वेबसाईटच्या माध्यमातून ती वेगवेगळ्या प्रकारचे चहा देते. यामध्ये भारतीय पद्धतीचा आल्याचा चहा पहिल्या क्रमांकावर आहे. तर ग्रीन चहा, चॉकलेट चहा, अशा अनेक पद्धतीच्या चहांचा समावेश आहे. या बिझनेसमधून ब्रुकने आतापर्यंत २५० कोटींचा नफा मिळवला आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News