बसस्टँडवरचं प्रेम

अविनाश जाधव, फलटण 
Monday, 16 September 2019

नकळत थांबली माझी नजर तु बसमध्ये असताना,
वाढले ह्रदयाचे ठोके तु गालात हसतांना.

नकळत थांबली माझी नजर तु बसमध्ये असताना,
वाढले ह्रदयाचे ठोके तु गालात हसतांना.

अचानक गहिवरलो मी तुझी ओळख असताना,
बोलणार तरी कसे सोबत मैत्रिणी दिसताना.

तुझ्या केसातील गजऱ्याचा सुगंध दरवळताना,
हरपलं भान माझं तुझ्या नजरेशी नजर भिजताना.

रंगलं आपलं असं प्रेम बसची वाट बघताना,
खराब झाली कॅटबरी तुला उपवास असताना.

जेव्हा तुला पाहिलं उदास असताना,
तु बोलनच बंद केलं काही कारण नसताना.

झालं माझं प्रेम तुझ्या हसण्याकडे पाहतांना,
तु मात्र नाकारलं तुला विचारलं असताना.

मग मात्र , 
आपण वेगळं जीवन जगणं पसंत केलं एकत्र असताना,
मी तेव्हा अस्तित्व निर्माण करणं पसंत केलं तुझी ना असताना.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News