पाऊस तिलाही आवडतो अन् मलाही...

अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
Friday, 26 July 2019

पाऊस तिलाही आवडतो..
पाऊस मलाही आवडतो...

ती म्हणजे श्रावण धारा
मी बेधूंद वारा
ती अळवावरचं पाणी 
मी गुणगुणतोय जुनी तराणी
पाऊसच दरवर्षी दोघांनाही हसवतो... 
पाऊस तिलाही आवडतो
पाऊस मलाही आवडतो

ती भेटते कधी कधी
हळुवार पावसाची सर बनून 
देतसे मीही आलिंगण तिजला
दोन्ही बाहु मुक्त करुन
पाऊसच आठवणीने 
दोन्ही हृदयांना फुलवितो.... 
पाऊस तिलाही आवडतो
पाऊस मलाही आवडतो

पाऊस तिलाही आवडतो..
पाऊस मलाही आवडतो...

ती म्हणजे श्रावण धारा
मी बेधूंद वारा
ती अळवावरचं पाणी 
मी गुणगुणतोय जुनी तराणी
पाऊसच दरवर्षी दोघांनाही हसवतो... 
पाऊस तिलाही आवडतो
पाऊस मलाही आवडतो

ती भेटते कधी कधी
हळुवार पावसाची सर बनून 
देतसे मीही आलिंगण तिजला
दोन्ही बाहु मुक्त करुन
पाऊसच आठवणीने 
दोन्ही हृदयांना फुलवितो.... 
पाऊस तिलाही आवडतो
पाऊस मलाही आवडतो

आकाशात ढग दाटून आले की
आधी माझं काळीज बरसतं
नातं तिचं नि माझं
पावसासाठी तरसतं
पाऊसच निखळपणे 
दोघांनाही रिझवतो...
पाऊस तिलाही आवडतो
पाऊस मलाही आवडतो

रिमझिमणारा पाऊस पाहून
आठवतात त्या भेटीगाठी
रुसवे-फुगवे शहारणे लाजणे 
ओला थेंब एक तो ओठी
तिचं नी माझं नातं जुळुन
दोघंही पाऊस होऊन जातो... 
पाऊस तिलाही आवडतो
पाऊस मलाही आवडतो

असाच पाऊस बरसत राहो
जुनी नवी तराणी घेवून
तिचं नि माझं मिलन व्हावं
पावसामध्ये चिंब न्हावून
दोघांच्याही स्पंदनांना 
पाऊसच जागवितो... 
पाऊस तिलाही आवडतो
पाऊस मलाही आवडतो

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News