शाहरुखचे चित्रपट जरी फ्लॉप होत असले तरी गौरीसोबतचा 'हा' डान्स झाला हिट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020

एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, यात तो 'तनु वेड्स मनु' च्या 'सद्दी गल्ली' या गाण्यावर गौरीबरोबर नाचताना दिसत आहे.

शाहरुख खानला त्याच्या चाहत्यांनी चित्रपटांमध्ये नाचताना आणि रोमन्स करताना बर्‍यापैकी पाहिले आहे, परंतु ऑफ कॅमेरा खुप कमी लोकांनी लोकांनी त्याला गौरीबरोबर नाचताना पाहिले असेल. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, यात तो 'तनु वेड्स मनु' च्या 'सद्दी गल्ली' या गाण्यावर गौरीबरोबर नाचताना दिसत आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#shahrukhkhan #gaurikhan set the dance floor on fire. Epic #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

हा व्हिडिओ करीना कपूरचा चुलत भाऊ अरमान जैनच्या लग्नाचा आहे. अरमानने 3 फेब्रुवारीला गर्लफ्रेंड अनिसा मल्होत्राशी लग्न केले. यानंतर मुंबईतच लग्नाचे रिसेप्शन घेण्यात आले. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, करण जोहर, शाहरुख खान, गौरी, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, मलाइका अरोरा, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्यासह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या रिसेप्शनला पोहोचले. कपूर कुटुंब तर तिथेच होते. पार्टीमधील जवळपास प्रत्येक सेलिब्रिटीने डान्स केला, पण शाहरुख आणि गौरीचा व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख बनावट मिश्या लाऊन नाचत आहे.

 

'बंटी और बबली' चित्रपटाच्या 'कजरारे' गाण्यावर करण जोहरही या दोघांसोबत नाचत आहे. करीना आणि करिश्मा कपूरने करण जोहरसोबत 'बोले चुडियान' गाण्यावर डान्स केला. कियारा अडवाणीने तिच्या 'गुड न्यूज' चित्रपटाच्या 'सौदा खारा-खारा' गाण्यावर डान्स केला. रणवीर कपूरने आपल्या चित्रपटाच्या 'बच्चन ए हसीनो' गाण्यावर डान्स केला. येथे दलेर मेहंदीचा मुलगा गुरदीप मेहंदीनेही डान्स सादर केला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News