विंडीजसोबतच्या सामन्यात गेम चेंजर ठरलेली ठाकूरशाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 December 2019

रोहित शर्मा, के.एल. राहुल आणि कर्णधार विराट कोहलीचे धमाकेदार खेळाला निर्णायक क्षणी मिळालेल्या शार्दुल ठाकूरच्या जिगरबाज फलंदाजीने भारताने रविवारी तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय  सामन्यात विंडीजचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह त्यांनी मालिका २-१ अशी जिंकली.  यामुळे भारतास वेस्ट इंडीजविरुद्ध दस का दमही दाखवताना सलग दहावी मालिका जिंकता आली. 

रोहित शर्मा, के.एल. राहुल आणि कर्णधार विराट कोहलीचे धमाकेदार खेळाला निर्णायक क्षणी मिळालेल्या शार्दुल ठाकूरच्या जिगरबाज फलंदाजीने भारताने रविवारी तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय  सामन्यात विंडीजचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह त्यांनी मालिका २-१ अशी जिंकली.  यामुळे भारतास वेस्ट इंडीजविरुद्ध दस का दमही दाखवताना सलग दहावी मालिका जिंकता आली. 

बाराबती स्टेडियमवरील या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी विंडीजची अवस्था ३१.३ षटकांत ४ बाद १४४ अशी केली होती, पण सुटलेले झेल तसेच स्वैर माऱ्यांमुळे भारताची पकड निसटली. विंडीजने अखेरच्या आठ षटकांत १०५ धावांची बरसात केली. त्यातील ७७ धावा तर अखेरच्या पाच षटकांत दिल्या होत्या. निकोलस पुरण आणि आयपीएलमध्ये सामना कधीही फिरवणारा किएरॉन पोलार्ड यांनी पाचव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी १६.२ षटकांतच केली. विंडीजने ५ बाद ३१५ धावा केल्या. त्यानंतर चांगल्या सुरवातीनंतर मधल्या फळीत घसरलेली गाडी शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी रुळावर आणली. भारताने ६ बाद ३१६ धावा केल्या. 

भारतास रोहित शर्मा आणि केएल राहुलने चांगली सुरुवात करून दिली होती. भारताने १ बाद १६७ सुरुवात केली, त्या वेळी ३० षटकेही पूर्ण व्हायची होती, पण २ बाद १८८ वरून भारताचा डाव श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केदार जाधव यांच्या अपयशामुळे  ५ बाद २२८ असा गडगडला. या पडझडीत विराट कोहली उभा राहिला होता. त्याची रवींद्र जडेजासह जोडी जमली त्या वेळी भारत सहज लक्ष्य साधणार असेच वाटत होते, पण स्फोटक हल्ला करणारा विराट कोहली पाच वर्षांत प्रथमच ८० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर बाद झाला. त्या वेळी लक्ष्य अवघड दिसू लागले; मात्र शार्दुल ठाकूरने प्रतिहल्ला करीत भारतच ताकदवान असल्याचे दाखवले. शार्दुल आणि जडेजाने १५ चेंडूंत ३० धावांची भागीदारी करीत भारतास आठ चेंडू राखून विजयी केले.

त्यापूर्वी भारतीयांत झेल सोडण्याची स्पर्धाच झाली. त्यातही रवींद्र जडेजा आणि रिषभ पंतचे अपयश धक्कादायक होते. जडेजाने नवव्या षटकात लुईसचा झेल सोडला, पण त्याचा फार फटका बसला नाही. पंतने २५ व्या षटकात हेटमायरला जीवदान दिले, त्या वेळी तो नऊ धावांवरच होता. त्यानंतर त्याने ३७ पर्यंत मजल मारली. भोपळा फोडण्यापूर्वीच पंतने रोस्टन चेसला जीवदान दिले.

बाराबती स्टेडियमवर भारतीय गोलंदाजी सुरुवातीच्या वर्चस्वानंतर भरकटतच गेली. सलामीच्या सामन्यात भारतास धावांचा तडाखा दिलेले शाई होप आणि शिमरॉन हेटमायर परतले, त्या वेळी फार तर अडीचशेचे लक्ष्य येईल असे वाटत होते. पुरन आणि पोलार्डने ४० व्या षटकापर्यंत जम बसवला आणि त्यानंतर हल्लाबोल केला. त्यांनी एकत्रितपणे १३ चौकार आणि १० षटकारांची आतषबाजी केली. पुरणचे एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरे शतक हुकले, पण त्याने भारतासमोरील आव्हान नक्कीच अवघड केले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News