शरद पवारांची सोशल मीडियावरील ही पोस्ट होतेय व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 June 2020

कोरोनाचं संकट महाराष्ट्रात गडद असताना, निसर्गचक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यात नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी नुकसान झालेल्या जिल्ह्याला भेट दिली. तातडीने पंचनामे करून लोकांना मदत करण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत. याबाबत त्यांनी फेसबुकवरती लिहिलेली पोस्ट अधिक वायरल होताना दिसत आहे 

कोरोनाचं संकट महाराष्ट्रात गडद असताना, निसर्गचक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यात नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी नुकसान झालेल्या जिल्ह्याला भेट दिली. तातडीने पंचनामे करून लोकांना मदत करण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत. याबाबत त्यांनी फेसबुकवरती लिहिलेली पोस्ट अधिक वायरल होताना दिसत आहे 

ही पोस्ट 

आज रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करून निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या नुकसानाची पाहणी केली. प्रशासकीय यंत्रणा अजून सगळ्याच ठिकाणी पोहचलेली नाही, त्यामुळे अजून ही प्राथमिक माहिती आपल्याकडे आली
असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या भागातील नुकसानग्रस्त फळबागा, शेती, घरे यांचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. जे नुकसान झाले आहे त्यात अधिकअर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी. आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचे मोठे नुकसान झालेय. त्यामुळे पुढील ७-८ वर्षांचा विचार करून ही नुकसान भरपाई द्यायला हवी.

येथील बागायत शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. जमीन साफ करून घेण्याची देखील मोठी अडचण आहे. रोजगार हमीतून फळबाग उत्पादन करण्याची ही योजना पुन्हा लागू केली तर इथला शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल.

राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज काही शेतकऱ्यांनी काढले आहे. सध्या हे कर्ज फेडण्याची त्यांची क्षमता दिसत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली सविस्तर माहिती सरपंच किंवा स्थानिक नगरसेवकांना द्यावी. या बँकांच्या प्रमुखांची बैठक घेऊन काही
सवलत मिळावण्याबद्दलचा प्रयत्न करण्यात येईल.

राज्याच्या मा. मुख्यमंत्र्यांनी चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत तात्काळ उद्याच बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कोकणवासियांना संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल. गरज भासल्यास आम्ही केंद्राकडे मदतीची मागणी करू. मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने हे करण्यात येईल.

कोकणातील बहुतांश भागाचे चक्रीवादळामुळे नुकसान झाले असतानाही इथला माणूस खचून गेला नाही तर पुन्हा कामालालागला आहे. पर्यटन क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्राला उभारी देण्यासंबंधीही विचार बैठकीत केला जाईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News