...तर शरद पवार प्रधानमंत्री होतील: रोहीत पवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

2024 साली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसारखा प्रयोग केला तर सामान्य माणसांचा नेता शरद पवार प्रधानमंत्री होतील

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला, असाच प्रयोग 2024 साली लोकसभा निवडणुकीत केला तर देशात महाविकास आघाडीसारख सरकार सत्तेवर येईल. सामान्य माणसांचा नेता शरद पवार प्रधानमंत्री होतील असा दृठ विश्वास कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केला. 

महाविकास विकास आघाडी तोडण्याचा प्रयत्न भापज नेते करत आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला डीवचण्याचा नेहमी प्रयत्न केला मात्र, महाविकास आघाडीन समान कार्यक्रमातून पक्षांची एकमुठ बांधली आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी मुठ सुटनार नाही असे पवार म्हणाले.    

जनतेचा पवार साहेबांवर विश्वास आहे, त्यामुळे सामान्य माणूस आपल्या समस्या घेऊन विश्वासाने साहेबांकडे येतो. साहेब जिथे जातील तिथे जनतेची आत्मीयतेनं विचारपूस करतात. जनतेचा विश्वास नसल्यास नेत्यांना हातात बूट धरावा लागतो असा टोला नाव न घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोहीत पवारने लगाला.

पवार साहेब प्रधानमंत्री व्हावे अशी जनतेची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पुर्ण करण्यासाठी भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक एकमताने लढवली तर सामान्य जनतेचे स्वप्न पुर्ण होऊ शकतील असेही पवार म्हणाले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News