शरद पवारांनी शब्द पाळला आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलाला नोकरी दिली...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

पुणे : उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने निवडणूक प्रचारादरम्यान चिट्टी लिहून आत्महत्या केली होती. ही घटना समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्या कुटुंबाची भेट घेऊन सरकारने या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी केली होती. तसेच ढवळे यांचा मुलगा निखिल याला 'विद्या प्रतिष्ठान बारामती' येथे नोकरी देण्याचे वचन दिले होते. शरद पवार यांनी कालच ते वचन पाळले. 

तडवळेचा निखिल कालपासून बारामतीत नोकरीवर रुजू झाला. पवारांनी दिलेला शब्द पाळला मात्र सरकारी यंत्रणा मात्र ढवळे कुटुंबाबाबत संवेदनाशून्य असल्याचे चित्र समोर आले आहे.

संकटाच्या ठिकाणी धावून जाणे, संकटग्रस्तांचे अश्रू पुसत त्यांना शक्य ती मदत करणे हे पवारांचे आजवरच्या राजकारणाचे सूत्र राहिले आहे. पूर असो, दुष्काळ असो शरद पवार यांनी सढळ हाताने मदत केली आहे. शेकडो लोकांच्या व्यक्तिगत सुखदुःखात पवार नेहमीच सहभागी झाले आहेत. 

तडवळे येथील दिलीप ढवळे यांनी आर्थिक पिळवणुकीला कंटाळून आत्महत्या केली होती. निवडणुकीच्या धामधुमीत हा प्रकार घडल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. यावेळी पवार यांनी ढवळे कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना आधार दिला होता. याचवेळी दिलीप यांच्या मुलाला नोकरी देण्याचे वचन दिले होते. हे वचन पवार यांनी पाळले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News