षंढ

मिलिंद मनोहर घायवट
Wednesday, 9 October 2019

झाडं....
मुकी बिचारी...
फक्त दुसऱ्याच्या उपयोगी यायचं
इतकंच काय ते त्यांना माहीत...

आपण हवं तेव्हा
त्यांना वापरून घ्यायचं
हवं तेव्हा त्यांना
तोडून टाकायचं..
ते काहीच नाही बोलणार,
ना कसला विरोध करणार...

झाडं....
मुकी बिचारी...
फक्त दुसऱ्याच्या उपयोगी यायचं
इतकंच काय ते त्यांना माहीत...

आपण हवं तेव्हा
त्यांना वापरून घ्यायचं
हवं तेव्हा त्यांना
तोडून टाकायचं..
ते काहीच नाही बोलणार,
ना कसला विरोध करणार...

त्यांच्यावर राहणारी पाखरं
मारणार जरासे पंख,
करणार जरासा चिवचिवाट
आणि..
उडून जाणार नव्या घरट्याच्या शोधात!!!

पण त्यांना ह्याचं काय???
कारण त्यांना माहित्येय,
ही झाडं काय, हे पक्षी काय 
नि किडा मुंग्यांसारखी जगणारी 
ही माणसे काय?
कोणीच काही नाही उखाडू शकत...

ना झाडे काही करणार..
ना पक्षी काही करणार..
निदान आपण बोलू, शिव्या देऊ,
चिडचिड करून घेऊ स्वतःची,
पण सोयीनुसार पुन्हा गुरफटून जाऊ स्वतःमध्येच
विसरून जाऊ सर्वच आपल्या रहाटगाड्यात..

ते देतील वेळोवेळी नवनवीन आश्वासने
करून घेऊ स्वतःचं स्वप्नरंजन
आणि 
पुन्हा भरभरून टाकू मतं
त्यांच्याच पारड्यात..
पुन्हा देऊ एकहाती निवडून
विसरून मागचं सर्वकाही..

ते करतील सोय येणाऱ्या सतरा पिढ्यांची
नि आपण करत राहू फक्त चर्चा
बेरोजगारीची, मंदीची
आणि ह्या अंधाधुंदीची

खरं सांगू का.??
आपणच गांडू झालो आहोत
शेपूट घालून गप्प बसलो आहोत.
आपली अवस्था काय वेगळीय म्हणा..
आपणही कोंडवून घेतलंय स्वतःला
नि दाबल्यात सर्वच
भाव भावना आतल्या आत.
अगदी झाडांसारख्याच..

तो दिवसही दूर नाही 
जेव्हा आपणही उखडून फेकले जाऊ
अगदी त्या झाडांसारखेच...
तोवर मात्र आपण षंढ बनून राहूया
तोवर मात्र आपण षंढ बनूनच राहुयात!!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News