शालिनी बॉलीवूड चित्रपटात झळकणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 January 2020

लवकरच ती ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. पहिल्याच बॉलीवूड चित्रपटात रणवीरसोबत काम करणं म्हणजे शालिनीसाठी मोठं बॉलीवूड पदार्पण आहे.

अभिनेत्री शालिनी पांडेने साऊथ चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपटातील तिच्या भूमिकेचे बरेच कौतुक झाले. या चित्रपटानंतर आता तिच्या बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.

लवकरच ती ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. पहिल्याच बॉलीवूड चित्रपटात रणवीरसोबत काम करणं म्हणजे शालिनीसाठी मोठं बॉलीवूड पदार्पण आहे.

याबाबत शालिनी सांगते, ‘रणवीरसारख्या पावरहाऊस कलाकारासोबत काम करणे म्हणजे माझ्यासाठी मोठी संधी आहे. त्याचबरोबर स्वतःला सिद्ध करण्याचा आत्मविश्‍वासही मिळाला.

रणवीरसोबत काम केल्यानंतर मी एक उत्तम अभिनेत्री बनेन असे 
मला वाटते.’ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News