पनवेलमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज वसतिगृह

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

मराठा आंदोलनाकांच्या मागण्यांची अंमलबजावणी करणारी राज्यातली पहिली पनवेल महानगरपालिका आहे.

पनवेल: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी कळंबोली येथे लवकरचं छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने वसतिगृह उभारण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत शुक्रवारी मराठा वसतिगृह स्थापनेचा ठराव मांडण्यात आला होता. या ठरावाला बहुमताने मान्यता देण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली. 

नवी मुंबई परिसरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावस्थापन अशा विविध शैक्षणिक संस्था आहेत. शिक्षणाच हब म्हणून हा परीसर उदयाला आला आहे. त्यामुळे राज्यभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी नवी मुंबईला येतात मात्र प्रतिकुल आर्थिक परिस्थितीमुळे शहरात राहून शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागते, अशा विद्यार्थ्यांना निशुल्क राहण्यासाठी पनवेल महानगरपालिका कळंबोली क्षेत्रात छत्रपती राजर्षी शाहू महाराज मराठा वसतिगृह, नविन पनवेल परिसर क्षेत्रात क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले मुलींचे वसतिगृह तर कोमोठे परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन बांधण्यासाच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली आहे.

समाज कल्याणसाठी राखीव असलेले भुखंड पनवेल महानगरपालिकेला सि़डको टप्याटप्याने हस्तांतरीत करणार आहेत. त्या भुखंडावर पनवेल महानगरपालिका वसतिगृह बांधणार आहे. अनेक दिवसापासून मराठा समाज आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहे. मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणसाठी वसतिगृहाची सोय करावी अशी प्रमुख मागणी होती. मराठा आंदोलकांच्या मागण्यांची अंमलबजावणी करणारी राज्यातली पहिली पनवेल महानगरपालिका आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News