शाहिद-कियारा ‘कबीर सिंग’ चित्रपटामधून एकत्र...

सकाळ वृत्तसेवा ( यीनबझ )
Tuesday, 9 April 2019

‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता या चित्रपटाचा ‘कबीर सिंग’ हा हिंदी रिमेक येतोय आणि अभिनेता शाहिद कपूर यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

शाहिदच्या चाहत्यांना प्रतीक्षा होती ती या चित्रपटाच्या टीझरची. आता याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे ‘अर्जुन रेड्डी’मध्ये विजय देवरकोंडाने अर्जुन रेड्डीची भूमिका साकारली होती.

चित्रपटाच्या या टीझरमध्ये शाहिदही हुबेहुब अगदी अर्जुन रेड्डीसारखाच दिसत आहे. विशेष म्हणजे त्याचा अभिनय आणि लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे

. या चित्रपटात तो वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे; तर अभिनेत्री कियारा अडवाणी या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिदबरोबर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. तिचीही या टीझरमध्ये एक झलक पाहायला मिळत आहे. संदीप वांगा यांचं दिग्दर्शन असणारा हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर काय कमाल करतो हे पाहायचंय...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News