शाहिद कपूरकडे चित्रपटांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019
  • शाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ चित्रपट सध्या बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे

शाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ चित्रपट सध्या बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. खरंतर हा चित्रपट शाहिदच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला आहे असेच म्हणावे लागेल. या चित्रपटानंतर शाहिदकडे हिंदी चित्रपटांच्या रांगा लागल्या आहेत. त्याला दोन बिग बजेट चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत.

करण जोहर आणि दिग्दर्शक राम माधवानी यांनी शाहिदला त्यांच्या पुढील चित्रपटासाठी विचारले आहे. करण जोहर ‘जर्सी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्यासाठी शाहिदची निवड केली आहे. करणने ‘जर्सी’चे अधिकृत हक्क खरेदी केल्याचीही चर्चा आहे. आता शाहिद या दोन्ही चित्रपटांना ग्रीन सिग्नल देतो का हे पाहणे रंजक ठरेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News