सरकारमध्ये शहाच अव्वल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019
  • मंत्रिमंडळाच्या आठ समित्यांची पुनरर्चना

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आठ महत्त्वाच्या समित्यांची पुनरर्चना केली आहे. या समित्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारमधील महत्त्वाच्या समित्यांमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा समावेश करण्यात आला आहे.

सुरुवातीला सर्वच समित्यांमध्ये केवळ शहांचा समावेश होता, यावर राजकीय वर्तुळामध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेल्या संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना संसदीय कामकाज, राजकीय व्यवहार, गुंतवणूक आणि आर्थिक विकास, रोजगार आणि कौशल्य विकास या समित्यांमध्ये सामावून घेण्यात आले.

सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक, बदल्यांचा निर्णय करणारी नियुक्ती समिती, सुरक्षाविषयक समिती, आर्थिक व्यवहारविषयक समिती, राजकीय व्यवहार, संसदीय कामकाज त्याचप्रमाणे निवास, गुंतवणूक आणि वृद्धी, रोजगार आणि कौशल्य विकास या मंत्रिमंडळ समित्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुनरर्चना केली. वरिष्ठ केंद्रीय मंत्री या समित्यांचे सदस्य असतील. 

स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री विशेष निमंत्रित सदस्य असतील. यातील सहा समित्यांमध्ये पंतप्रधान मोदी आहेत. तर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सात आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा पाच समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सुरक्षाविषयक समिती
प्रमुख : नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सदस्य : संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन
 

अर्थव्यवहार समिती
प्रमुख  : नरेंद्र मोदी
सदस्य : राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, रसायन आणि खतमंत्री सदानंद गौडा, निर्मला सीतारामन, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद, अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, पीयूष गोयल आणि पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान
 

संसदीय व्यवहार समिती
प्रमुख : अमित शहा, सदस्य : राजनाथसिंह, निर्मला सीतारामन, अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान, नरेंद्रसिंह तोमर, रवीशंकर प्रसाद, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News