कोरोनाच्या लढाईत शारुखानची उडी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 April 2020

बॉलीवूडचा किंग खान शाहरूखनेही आपल्या कार्यालयाची संपूर्ण इमारतच विलगीकरणासाठी महापालिकेला दिली आहे.

मुंबई : कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असताना विलगीकरण कक्ष वाढवण्याकडेही सरकारतर्फे भर दिला जात आहे. विलगीकरण कक्ष कमी पडू नयेत म्हणून उद्योजकांपासून ते कलाकार मंडळीही आपापल्या परीने मदत करत आहेत. बॉलीवूडचा किंग खान शाहरूखनेही आपल्या कार्यालयाची संपूर्ण इमारतच विलगीकरणासाठी महापालिकेला दिली आहे. हे कार्यालय विलगीकरणासाठी तयारही झाले असून शाहरूखची पत्नी गौरी खानने या कार्यालयाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित केला आहे.

शाहरूखच्या या कार्यालयाची इमारत चार मजली आहे. इमारतीमध्ये विलगीकरणासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे विलगीकरण कक्ष नेमके कसे आहे, याचा संपूर्ण व्हिडीओ गौरी खानने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात गौरी खान म्हणते, "विलगीकरणासाठी हे कार्यालय तयार झाले असून या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आपण एकत्र येऊन लढायचे आहे, शाहरूख आपल्या फाऊंडेशनद्वारेही गरजूंना मदत करत आहे. त्याशिवाय 50 हजार पीपीई किट्‌स त्याने दान केले आहेत.'

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News