Shafali Verma : सामन्यात पुरुष बनून 'मॅन ऑफ टूरनामेंट' जिंकणारी खेळाडू 

यिनबझ टीम
Tuesday, 3 March 2020

शेफाली वर्मा, जी मुलांच्या स्पर्धेत मुलगा म्हणून खेळली आणि ती 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' बनली

27 फेब्रुवारी 2020 ही तारिख भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नला चांगलाच आठवणीत राहिल. शेफाली वर्मा नावाच्या खेळाडूने संघाचा खेळ सावरत आपल्या अनोख्या शैलीतून महिला क्रिकेटमध्ये पहिला विजय मिळवून दिला होता.

त्या सामन्यात 34 चेंडूत 46 धावा शेफाली वर्माने बनवल्या होत्या. सध्याच झालेल्या म्हणजेच 27 मार्चच्या न्यूझीलंडसोबतच्या सामन्यांतर भारतीय संघ थेट सेमिफायनलमध्ये पोहोचला आणि चर्चांना सुरूवात झाली. या सगळ्या चर्चांनामध्ये अजून एक नाव होतं ते म्हणजे 16 वर्षीय शेफाली वर्मा.

पेशाने सोनार असलेले शेफाली वर्माचे वडील रोज सकाळी लवकर उठून शेफालीला कोणत्या ना कोणत्या मैदानावर घेऊन जात असत. स्वत: एक क्रिकेटर बनायचं स्वप्न असलेल्या संजीव वर्मांना क्रिकेटर होता आलं नाही, त्यामुळे आपल्या मुलांनी क्रिकेटर व्हावं, अशी त्यांची इच्छा होती.

शेफाली 12 वर्षांची असताना तिचा भाऊ साहिलला एका टुर्नामेंटमध्ये भाग घ्यायचा होता. मात्र साहिल अचानक आजारी पडल्याने संजीव यांनी एक युक्ती केली. साहिलच्या बदल्यात शेफालीला क्रिकेट सामना खेळण्यासाठी पाठवले, कोणाला समजले नाही की समोर खेळण्यासाठी आलेली ही मुलगी आहे. हे सगळं सुरू असताना पानिपत येथील संपूर्ण टुर्नामेंट शेफालीने आपल्या नावावर केली होती.

महिला टी-20 वर्ल्ड कप खेळणारी शेफाली ही सगळ्यात तरुण खेळाडू मानली जाते. तिने सगळ्यात कमी वयात जलद अर्ध शतक बनवून सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड मोडले आहे. तिने 17 टी-20 सामन्यात तब्बल 438 धावा बनवणारी सर्वात युवा खेळाडू बनली आहे.

Shafali Verma : सामन्यात पुरुष बनून 'मॅन ऑफ टूरनामेंट' जिंकणारी खेळाडू 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News