शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने राऊतांची तंतरली - मनसे

यिनबझ टीम
Wednesday, 11 March 2020

शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने राऊतांची तंतरली, अख्खा अग्रलेख सावलीवर खर्च केल्याबद्दल शॅडो संपादकांचे आभार म्हणत मनसेनेही संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.

शनिवार दिनांक 09 मार्च रोजी मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली. सरकारच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने या कॅबिनेटची स्थापना करण्यात आली होती, याच शॅडोवर शिवसेनेच्या मुखपत्रातून सवाल उठवले आहेत. हा खेळ सावल्यांचा! शॅडो म्हणजे नेमके काय? अशा शब्दात मनसेच्या कार्यक्रमावर आजच्या सामन्यातून सवाल उठवल्याचे पाहायला मिळते. त्यालाच उत्तर देत शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने राऊतांची तंतरली, अख्खा अग्रलेख सावलीवर खर्च केल्याबद्दल शॅडो संपादकांचे आभार म्हणत मनसेनेही संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर खरमरीत टिका करत एक ट्विट केलं आहे. ज्यात "शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं, या सदिच्छा. असा उल्लेख करण्यात आला आहे.

महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे व तिथे भाजपा हा एक प्रबळ विरोधक आहे. त्या 105 आमदार वाल्या पक्षाने शॅडो मंत्रीमंडळ वैगेरे बनवलं नाही, पण एकमेव आमदार वाल्यांनी शॅडो की काय ते बनवलय, असा प्रहार सामनाच्या संपादकीय लेखातून करण्यात आला. 

शॅडो मुख्यमंत्री हा अधिकृत विरोधी पक्ष नेता असतो. या मंत्रीमंडळास शपथ देण्यासाठी एखादा शॅडो राज्यपाल नेमले असते, खेळ सावल्यांचा अधिकच रंजक झाला असता, अशीही टिका सामन्यातून करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News