ममतेच्या पलीकडची सावली ; माझी कष्ट करणारी 'सुंदर' आई...

नागनाथ पवार (यिनबझ)
Sunday, 12 May 2019

आई तुझे उपकार, तूझं प्रेम म्हणजे आमची ताकद आहे... आमचा श्वास आहेस तू. अशीच पप्पा, योगा आणि माझ्यासोबत  आहेस आणि आयुष्यभर राहशील येवढीच माझी इच्छा. तुला आणखी दीर्घायुष्य लाभो. 
I love u आई.  

खर म्हणजे  आपली आई  तशी कष्ट करणारी, शेतात राबणारी.  तिचा रंग ही काही अगदी गोरा नाही. शेतातल्या मातीशी  तिची गट्टीच जमलेली.  दिवसभर शेतात काबाड कष्ट करणारी ती... काही झालं तरी कधी थकत नाही. तिची ती ताकद पर्वतापेक्षाही मोठी आहे असं मला वाटते. 

आईचा देखणेपणा हा तिच्या लेकरावरच्या प्रेमात आणि कामात जेवढा असतो तेवढा कदाचित दिसण्यात नसेल. आईने  आयुष्यभर आमच्यासाठी  केलेले कष्ट आणि बापानं समाजासाठी घेतलेले कष्ट याची तुलना कशी करावी? याचा मला आज प्रश्नच पडलाय.  

माझी आई तशी काहीच शिकलेली जरी नसली, तरी तीला सगळं अगदी सहज समजतं. आपल्या पोरांची आणि नवऱ्याची  असलेली काळजी तिच्याएवढी फक्त तिलाच करता येते. वडील आयुष्यभर सामाजिक कार्यकर्ते म्हणून सतत फिरत असताना त्यांनी जेवढी समाजाची काळजी घेतली आहे, घेत आहेत, तेवढीच आईने पण आमची काळजी घेतली.  

आपली पोरं, आपला नवरा चांगला दिसावा चांगली राहावीत, त्यांना काही त्रास होऊ नये यासाठी तिची फार मोठी जबाबदारी आजही आहे. मी बोर्डिंगला शिकायला असल्यापासून आणि आत्तासुध्दा तिच्या कष्टाचे पैशे ती आम्हा दोन्ही भावांना देते.  आमचे वडील अनेक वेळा तीन चार दिवस घरी येत नाहीत. सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस समाजाच्या लोकांच्या मदतीला रात्रंदिवस लागलेला असतो. आशा वेळेस आईने वडीलांना दिलेला पाठिंबाही त्यांच्यासाठी एक ऊर्जाचं होती. 

घरातल्या सर्व गोष्टी आई स्वतःच्या कष्टातून अगदी सहज पार करते.  शेतातली सगळी काम ती पुरुषांप्रमाणे करते. तिच्या या कष्टाची बरोबरी आणि तीच घर चालवण्यासाठीचे धाडस केवढं असेल, हे मला तरी सांगता येत नाही.  आम्ही घरात फक्त चार  माणसं. आमचं कुटुंब लहान आहे.  आई 'पप्पा मी आणि माझा लहान भाऊ योगेश एवढेच आम्ही. परंतू घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या ही खूप आहे.  

वडिलांच्या सामाजिक कार्याचा वसा तिने इथेही प्रमाणिकपणे पार पाडला. घरी अलेल्या प्रत्येक पाहूण्याला चहा पिल्याशिवाय तिने कधी परत पाठवलेलं मला आठवत नाही. रोज किमान चार पाहुणे किंवा गावातली चार लोकं तरी घरी येतातच, आमचं घर  म्हणजे समाजाच हक्काच व्यासपीठच आहे. वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने वडीलांना जेवढी लोकं भेटतात, अडचणी सांगतात आणि वडील जसं ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, तसच आईसुध्दा आपलं काम करते. जणू तिनेही आता त्यांच्या कामात हातभार लावायला सुरवात केली आहे.  

ज्यांच्या रक्तात समाजासाठी, लोकांसाठी प्रेम असते काहीतरी करण्याची धडपड असते, ती तळमळ शांत बसू देत नाही. त्याप्रमाणे जिथे कोणाला तिची गरज असेल तिथे धावत पळत ती समोर जाते. प्रत्येकाच्या अडचणीत ती शक्य असेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते. मिटवण्याचा प्रयत्न करते. ज्याप्रमाणे घाम गाळून  कष्ट करून तिने आपला संसार आजपर्यंत तेवढ्याच  ताकतीने पुढे आणलाय. 

आई-वडील कष्टाची आणि मेहनतीची कमाई करून खाऊन जीतकं जमेल तीतकं आम्हा दोन्ही भावांना शिकवलंय.  हे आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. वाडीलांचा समाजिक कार्याचा वसा तिही आपल्या पद्धतीने पुढे ढकलत असते. आमच्या घरातली   लोकांच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत असणारी तळमळ ही आईने खऱ्या अर्थाने टिकवली आणि वाढवलीसुध्दा.

पप्पांनी सामाजिक संघटनेत काम करताना घरी कमी परंतु आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ समजला दिला तरीही आई मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ऊभी आहे म्हणून वडिलांनी हे सामाजिक कार्याच शिखर गाठलं. त्यांना ते बिनधास्त पने करता आल. ती कुटुंबाची सगळी जबाबदारी स्वतःच्या कष्टातून आजही पार पाडत आहे.  वडिलांकडे तिने कधीही कशाचीही मागणी कधी केली नाही. 

ती अगदी सहज आणि साधं राहून  आपल्या संसाराचा गाढा ओढत आहे. आईचे  कष्ट आणि तिची कुटुंबाची जबाबदारी ही   वाडीलापेक्षा  नक्कीच कमी नाही. वडिलांनी समाजाच्या "वडिलांची" भूमिका जशी पार पडली, कोणावरही अत्याचार झाला तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी अगदी झेलमध्येसुद्धा ते अनेक वेळा गेले. त्याचप्रमाणे आईनेसुद्धा कुटुंबाच्या "वडिलांची" जबाबदारी आजपर्यंत अतिशय ताकतीने पार पाढली आहे. तिच्याबद्दल लिहताना मला कितीही लिहलं तरी कमीच वाटणार आहे. तिच्या आयुष्याची कहाणी एखाद्या कादंबरीपेक्षा नक्कीच कमी नाही. माझ्या आईवर नंतर मी किती लिहिलं, एक पुस्तक किंवा त्यापेक्षाही जास्त आता माहिती नाही; पण लिहणार येवढं नक्की. 

आई तुझे उपकार, तूझं प्रेम म्हणजे आमची ताकद आहे... आमचा श्वास आहेस तू. अशीच पप्पा, योगा आणि माझ्यासोबत  आहेस आणि आयुष्यभर राहशील येवढीच माझी इच्छा. तुला आणखी दीर्घायुष्य लाभो. 
I love u आई.  

आज एवढंच कष्ट करणाऱ्या आणि खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या आईसारख्या सर्व मातांना खूप खूप शूभेच्छा...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News