शब्दसह्याद्री ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

हरीश शर्मा
Thursday, 29 October 2020

ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली होती राज्यभरातून १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला! पहिल्या फेरीत आपला आवडता विषय स्पर्धांकांनी मांडला या फेरीतून एकूण ७० विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीत मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे ७१ पैलू विषय म्हणून स्पर्धकांना देण्यात आले.

प्रा.साई महाशब्दे संचलित शब्दसह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनी व व्यक्तिमत्व विकास केंद्र यांच्यावतीने आयोजित शब्दसह्याद्री राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पाडली.

ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली होती राज्यभरातून १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला! पहिल्या फेरीत आपला आवडता विषय स्पर्धांकांनी मांडला या फेरीतून एकूण ७० विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीत मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे ७१ पैलू विषय म्हणून स्पर्धकांना देण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेबरोबरच श्रोत्यांनाही बक्षीस मिळवून देणारी उत्कृष्ट श्रोता स्पर्धा घेण्यात आली श्रोत्यांसाठी आयोजित केलेली पहिली व एकमेव स्पर्धा होती.त्याच प्रसंगी सकाळ यिन च्या विविध सकाळ यिन चे प्रतिनिधी आदित्य देशमुख नि स्पर्धेत भाग घेतला 
यात श्रोत्यांचा व परिक्षकांचा निकाल सारखा आलेल्या श्रोत्यांना रुपये ५०० व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

मनोगत
साई महाशब्दे:(संस्थापक संचालक शब्दसह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनी

राज्यभरातून स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला स्पर्धकांनी त्यांची मतं सूंदर पद्धतीने मांडली आपण वक्तृत्वाचं काहीतरी देणं लागतो या दातृत्वाच्या भावनेतुन साकारलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागला .

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर स्पर्धेचाबक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला या प्रसंगी अभिनेत्री साक्षी गांधी, लेखक संजय औटे, आकाशवाणी अधिकारी नम्रता फलके, प्रा.साई महाशब्दे आदी प्रमुख पाहुण्यांची विशेष उपस्थिती होती.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्वप्नजा वालवडकर,ऋषिकेश साळुंके ,जालिंदर जगताप यिन गंगापूर तालुका प्रतिनिधी,आदित्य देशमुख यिन प्रतिनिधी,शीतल संकपाळ यांनी मेहनत घेतली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News