चित्रीकरणादरम्यान चिन्मयला गंभीर दुखापत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान चिन्मयला गंभीर दुखापत झाली होती. चित्रपटातील ‘लागेना’ या गाण्याच्या सेटवर विटांची एक कमान बांधण्यात आली होती. गाण्याचे चित्रीकरण संपल्यानंतर तो मॉनिटरवर चित्रीकरण कसे झाले हे पाहायला गेला आणि त्या कमानीला टेकला.

अभिनेता चिन्मय उदगीरकर सध्या त्याच्या ‘मेकअप’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो अभिनेत्री रिंकू राजगुरूसोबत झळकणार आहे. यामध्ये तो डॉक्‍टर नील आणि मेकअप आर्टिस्टची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान चिन्मयला गंभीर दुखापत झाली होती. चित्रपटातील ‘लागेना’ या गाण्याच्या सेटवर विटांची एक कमान बांधण्यात आली होती. गाण्याचे चित्रीकरण संपल्यानंतर तो मॉनिटरवर चित्रीकरण कसे झाले हे पाहायला गेला आणि त्या कमानीला टेकला.

तितक्‍याच कमान कोसळली आणि चिन्मयच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. या वेळी सेटवरील टीमने त्याला दवाखान्यात दाखल केले. दोन तासानंतर तो सेटवर पुन्हा हजर आला आणि चित्रीकरणाला सुरुवात केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News