सतरा वर्षीय तरुणीने दिला बाळाला जन्म

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

रेल्वे पटरीच्या शेजारी असलेल्या झाडाझुडपांत कपड्यात गुंडाळून फेकलेले आढळले. नवजात बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने परिसरातील रहिवाशांनी तिकडे धाव घेतली.

परळी वैजनाथ : येथे स्त्रीजातीचे नवजात अर्भक सोमवारी (ता. २४) रात्री साडेआठच्या सुमारास रेल्वे पटरीच्या शेजारी असलेल्या झाडाझुडपांत कपड्यात गुंडाळून फेकलेले आढळले. नवजात बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने परिसरातील रहिवाशांनी तिकडे धाव घेतली. या बाळाला तत्काळ उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यासंदर्भात पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. यानंतर गुप्त विभागाच्या पथकाचे प्रमुख रमेश सिरसाट यांनी सहकार्यांसह प्रयत्नांची शर्थ करीत १८ तासांत १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.  या घटनेची माहिती मिळताच बाळाचे पालकत्व सामाजिक न्याय व विशेष सहायमंत्री धनंजय मुंडे व खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले व तिचे नामकरणही करण्यात आले. सध्या परळीत महाशिवरात्री महोत्सव सुरू असल्याने या मुलीचे नाव शिवकन्या ठेवण्यात आले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News