या रुग्णालयात आनखी सात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 April 2020
  • बॉम्बे हॉस्पिटलमधील पाच डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती

मुंबई : बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणखी सात डॉक्‍टर आणि परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यामुळे रुग्णांची संख्या 12 झाली आहे.

यापूर्वी बॉम्बे हॉस्पिटलमधील पाच डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 14 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आता आणखी सात जणांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

या सात जणांमध्ये चार निवासी डॉक्‍टर आणि तीन परिचारिकांचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या 12 वर गेली आहे. नव्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News