आधार मार्गदर्शन केंद्रात सेट- नेट कार्यशाळा संपन्न

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 March 2020

ध्येयवेड्या युवकाने प्रत्येक "रविवारी स्पर्धा परीक्षा संवाद" घेण्याचा संकल्प केला आहे व त्याचाच भाग म्हणजे "पहिला स्पर्धा परीक्षा संवाद" सेट/ नेटचा अभ्यास करणाऱ्या युवकांसाठी मोफत कार्यशाळा घेण्यात आली.

उदगीर: येथील मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित 'आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राच्या' वतीने ज्या विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न आहे पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सेट- नेटची शिकवणी लावण्यासाठी मोठमोठ्या शहरात जाऊ शकत नाहीत अशा अनेक विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावी या हेतूने उदगीर येथील सतत सामाजिक कार्यात व विद्यार्थी चळवळीत अग्रेसर असणारा युवक श्रीकांत जाधव यांनी मातोश्री शारदाबाई पवार सेवाभावी संस्थेची स्थापना केली.

संस्थेच्या माध्यमातून मोफत अभ्यासिका स्थापन केली एवढ्यावरच न थांबता या ध्येयवेड्या युवकाने प्रत्येक "रविवारी स्पर्धा परीक्षा संवाद" घेण्याचा संकल्प केला आहे व त्याचाच भाग म्हणजे "पहिला स्पर्धा परीक्षा संवाद" सेट/ नेटचा अभ्यास करणाऱ्या युवकांसाठी मोफत कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी मार्गदर्शक म्हणून उदयगिरी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी सेट/नेट परीक्षेचा सर्वांना उपयोगी असणारा पेपर पहिला या विषयावर सखोल मार्गदर्शन केले व अभ्यास कसा करावा अभ्यासातील छोट्या छोट्या टिप्स विद्यार्थ्यांना समजून सांगून त्या आंमलात आणावे यासाठी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणारे उदयगिरी महाविद्यालयाचे लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतेवेळी वेळेचे नियोजन कसे केले पाहिजे व प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून आपल्या निश्चित ध्येयापर्यंत कसे गेले पाहिजे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस उदगीर तालुक्यातील जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून मोफत कार्यशाळेचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन "आधार मोफत अभ्यासिकेचे" व्यवस्थापन परिषद सदस्य जयकुमार लवटे यांनी केले तर कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश काय आहे हे विद्यार्थ्यांना मातोश्री शारदाबाई पवार संस्था संचलित "आधार मोफत अभ्यासिकेचे" संचालक श्रीकांत जाधव यांनी सांगितले व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News