मुंबईत कोरोना विषाणू संसर्गाच्या अभ्यासासाठी 'सेरो सर्व्हे' सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

मुंबईत बुधवारपर्यंत तीन लाख 64 हजार 753 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईत बुधवारपर्यंत तीन लाख 64 हजार 753 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील 13 लाख 44 हजार नागरिकांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे.
कोव्हिडच्या नियमित चाचण्यांबरोबर अर्ध्या तासात अहवाल येणाऱ्या ×ंटीजेन चाचण्यांचे एक लाख किट खरेदी करण्यात आले आहेत. या चाचण्या 3 जुलैपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोव्हिड चाचण्यांची रोजची संख्या 5000 पुढे गेली आहे. बुधवारी मुंबईत 5483 चाचण्या झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

मुंबईत आतापर्यंत 16 लाखांहून अधिक नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले असून, त्यांतील 13 लाखांहून अधिक जणांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. शोध, चाचणी, उपचार यामुळे धारावीसारख्या एकेकाळी कोरोना हॉट स्पॉट असलेल्या भागातील प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे.

सेरो सर्व्हे सुरू
देशभरात कोरोना विषाणू संसर्गाच्या अभ्यासासाठी रक्तनमुने सर्वेक्षण म्हणजे 'सेरो सर्व्हे' सुरू आहे. मुंबईतही नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि इतर संस्थांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यात 10 हजार नागिरकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार असून, प्रतिद्रव्ये तपासली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील कोव्हिडचा कल समजू शकेल. चेंबूर, माटुंगा, शीव, वडाळा, दहिसर या भागांतील नागरीकांच्या रक्ताची तपासणी होणार आहे.

कोरोनाक्रम
फेब्रुवारी : पहिली कोव्हिड चाचणी
11 मार्च : पहिला कोविड रुग्ण
6 मेपर्यंत : एक लाख चाचण्या
1 जून : दोन लाख चाचण्या
24 जून : तीन लाख चाचण्या
8 जुलै : तीन लाख 64 हजार 753 चाचण्या

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News