सार्बियाच्या नोव्हाक जोकोविचे आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • कोरोना विषाणूचा परिणाम क्रीडा विश्‍वावर झाला. आता पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेसाठी आयोजकांकडून नियोजन सुरू झाले आहे.

मेलबर्न : कोरोना विषाणूचा परिणाम क्रीडा विश्‍वावर झाला. आता पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेसाठी आयोजकांकडून नियोजन सुरू झाले आहे. कमी प्रेक्षकांची उपस्थिती आणि खेळाडूंसाठी जैवसुरक्षित वातावरणात स्पर्धा होण्याची शक्‍यता आहे. "आगामी अमेरिकन आणि फ्रेंच खुल्या ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धांचे आयोजन कशा प्रकारे करण्यात येईल हे पाहावे लागणार आहे, त्यामुळे जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे आयोजन कशा प्रकारे करायचे याचे नियोजन सुरू केले आहे, असे "टेनिस ऑस्ट्रेलिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रेग टिले यांनी सांगितले. यामध्ये सुरक्षित अंतर आणि कमी प्रेक्षकांची संख्या असणे या मुख्य गोष्टींवर भर दिला जाणार आहे.

मेलबर्न आणि व्हिक्‍टोरिया राज्यातील प्रेक्षकांनाच प्रवेश देण्याचा विचार असून जर आंतरराष्ट्रीय सीमांवरील निर्बंध उठवले, तर न्यूझीलंडच्या प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबत विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंना संपूर्णपणे जैवसुरक्षित वातावरणात ठेवण्यात येणार असून परदेशी प्रेक्षकांना प्रवेश मिळणार नाही, असे टिले यांनी स्पष्ट केले. शिवाय "परदेशी खेळाडूंना ऑस्ट्रेलियात आल्यावर काही दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक' असणार असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त यंदाच्या झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत सार्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमचा पराभव करत आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News