अगळा वेगळा ट्रॅव्हल शो

विशाखा टिकले
Saturday, 30 March 2019

भटकंतीपेक्षा परस्परांमधील नात्यांना जास्त महत्त्व देण्यात आलंय. त्यामुळे याला गेम-शोचं स्वरूप जास्त आलंय. जसं घडतंय तसं दाखवण्याचा प्रयत्न करत असले, तरी असे कार्यक्रम काही प्रमाणात स्क्रिप्टेड असतात, अशी टीकाही केली जाते. त्यामुळे समोर घडणारे प्रसंग बऱ्याचदा कृत्रिमच वाटतात. फक्त मनोरंजन हाच हेतू डोळ्यासमोर ठेवला तर अशा कार्यक्रमातून काहीतरी वेगळी संकल्पना पाहिल्याचं समाधान मिळतं. ट्रॅव्हल शो म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती जगभरातील नयनरम्य ठिकाणं आणि त्यांची सफर घडवून आणणारे निवेदक. या ट्रॅव्हल शोजच्या स्वरूपात आजवर अनेक बदल होत गेले. ‘मॅक्‍स प्लेअर’च्या ‘लव्ह ओके प्लीज’ या वेबसीरिजच्या माध्यमातून आता हा कार्यक्रम एका हटके रूपात आपल्यासमोर आलाय. ‘ट्रॅव्हल प्लस गेम-शो असं ज्याचं वर्णन करता येईल, अशी ही वेबसीरिज आहे. सध्या या वेबसीरिजचे सहा भाग प्रदर्शित करण्यात आलेत; तर लवकरच याचा दुसरा सीजनही येतोय.

प्रवासात आपला जोडीदार आपल्याला सापडू शकतो का? अशी थीम डोळ्यासमोर ठेवत या कार्यक्रमाची रचना करण्यात आलीय. भारतातल्या विविध प्रांतातून तीन मुलगे आणि तीन मुलींची यासाठी निवड करण्यात आलीय. सुरुवातीच्या भागात त्यांना त्यांच्या जोड्या निवडण्याची मोकळीक देण्यात आली आणि या जोड्यांसोबत सुरू झाला हिमाचल प्रदेशच्या निसर्गरम्य परिसरातला प्रवास. या प्रवासात प्रत्येक जोडीला एक खेळ देण्यात आला. जोडीने एकेक खेळ पूर्ण करत असताना त्यांच्यातल्या नात्यात कसे बदल होत जातात, हे पाहणं एक मजेशीर अनुभव ठरतो. खासकरून एका दिवसासाठी या जोड्या बदलल्या जातात तेव्हा काय होतं? वरवर प्रेमळ वाटणाऱ्या या जोड्यांच्या मनात नेमकं काय चालतं, ते या सीरिजमध्ये पाहायला मिळतं. यातला ‘भांग भजी’चा एपिसोड भुवया उंचावणारा ठरला; कारण भांगेच्या अमलाखाली प्रत्येक स्पर्धकाने आपल्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी उघडपणे बोलून दाखवल्या.

या सीरिजमध्ये ट्‌विस्ट आला तो दोन नव्या स्पर्धकांच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे. स्पामध्ये मसाज करणाऱ्या मुला-मुलींशी गप्पा मारताना मनातल्या गोष्टी बोलून दाखवणं स्पर्धकांना चांगलंच महाग पडलं. कारण हेच मसाज करणारे पुढे स्पर्धक म्हणून कार्यक्रमात दाखल झाले. या दोन स्पर्धकांच्या येण्याने आधीच्या स्पर्धकांमध्ये भांडणं झाली आणि फूट पडली. आता येणाऱ्या नव्या सीजनमध्ये या जोड्यांमध्ये काय बदल होतात, आधीच निर्माण झालेली नाती यात टिकतात का? सफर में हमसफर कोणाला मिळतो, हे पाहणं औत्सुक्‍याचं ठरणार आहे.

 हिमाचलचा अद्‌भुत निसर्ग आणि करण वाहीचं दिलखुलास निवेदन ही या कार्यक्रमाची दोन मुख्य आकर्षणं. या कार्यक्रमात भटकंतीपेक्षा परस्परांमधील नात्यांना जास्त महत्त्व देण्यात आलंय. त्यामुळे याला गेम-शोचं स्वरूप जास्त आलंय. जसं घडतंय तसं दाखवण्याचा प्रयत्न करत असले, तरी असे कार्यक्रम काही प्रमाणात स्क्रिप्टेड असतात, अशी टीकाही केली जाते. त्यामुळे समोर घडणारे प्रसंग बऱ्याचदा कृत्रिमच वाटतात. फक्त मनोरंजन हाच हेतू डोळ्यासमोर ठेवला तर अशा कार्यक्रमातून काहीतरी वेगळी संकल्पना पाहिल्याचं समाधान मिळतं.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News