डच लीगसाठी ‘या’ खेळाडूची निवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 July 2020

मुंबईचा आघाडीचा हॉकीपटू देविंदर वाल्मीकी याला नेदरलॅंडस्‌मधील हॉकी लीगसाठी करारबद्ध करण्यात आले आहे. तो या लीगमध्ये खेळण्यासाठी बुधवारी नेदरलॅंडस्‌ला रवाना होत आहे.

मुंबई :- मुंबईचा आघाडीचा हॉकीपटू देविंदर वाल्मीकी याला नेदरलॅंडस्‌मधील हॉकी लीगसाठी करारबद्ध करण्यात आले आहे. तो या लीगमध्ये खेळण्यासाठी बुधवारी नेदरलॅंडस्‌ला रवाना होत आहे. युरोपातील लीग खेळण्यासाठी भारतीय खेळाडूस एकाच क्‍लबने सलग दुसऱ्या मोसमासाठी निमंत्रित
केल्याची ही पहिलीच वेळ आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंद आहे; पण ज्याप्रमाणे परदेशातील भारतीय मायदेशी परतत आहेत, त्याचप्रकारे नेदरलॅंडस्‌वासीयांना मायदेशी नेण्यासाठी विमानसेवा आहे. याच केएलएम विमानसेवेत मला नेदरलॅंडस्‌ला जाण्यासाठी तिकीट मिळाले आहे. क्‍लबने निमंत्रणाचे पत्र पाठवले होते, त्यामुळे मला तिकीट मिळवण्यासाठी प्रश्न आले नाहीत, असे देविंदरने सांगितले. अर्थातच मला नेदरलॅंडस्‌ला गेल्यावर चौदा दिवसांच्या विलगीकरणात राहवे लागणार आहे. त्याची व्यवस्था आमच्या क्‍लबने केली आहे. अर्थातच हे विलगीकरण संपल्यावर ऑगस्टपासून सरावास सुरुवात होईल. लीगला सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

भारतीय हॉकी संघाच्या सराव शिबिरासाठी निवड न झाल्यामुळे देविंदरने गेल्या मोसमात एचजीसी या डच क्‍लबकडून खेळण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता. नामवंत मार्गदर्शक पॉल व्हॅन ऍस यांच्याकडे या संघाची धुरा आहे. त्या संघातून केंता तानाका, मैको कॅसाला (अर्जेंटिना), स्टीव व्हॅन ऍस हेही खेळतात. या लीगमध्ये खेळल्याचा नक्कीच मला फायदा होईल. त्यामुळे राष्ट्रीय संघातील प्रवेशाचेही दरवाजे उघडण्याची शक्‍यता आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News