भाजयुमोच्या जिल्हा सचिवपदी सागर बिरादार यांची निवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 June 2020

आजपर्यंत केलेल्या कामाची दखल पक्षाने घेतल्यामुळे एक सच्च्या कार्यसकर्त्याला न्याय मिळाला अशी भावना सागर बिरादार यांनी व्यक्त केली.

लातूर : भारतीय जनता युवा मोर्चाची कार्यकारिणी शुक्रवारी (ता.12) नुकतीच जाहीर करण्यात आली. उदगीर येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते तथा  जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांचे खंदे समर्थक सागर अशोक बिरादार यांची भाजयुमोच्या जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. 

वेळी माजी कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर श्रुंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेशआप्पा कराड, जि प अध्यक्ष राहुल केंद्रे, रामभाऊ तिरुके, बापूसाहेब राठोडं, प्रेरणा ताई होनराव, पंडित सूर्यवंशी,उदगीर शहर अध्यक्ष उदयसिंह ठाकूर, न. प सदस्य गणेश गायकवाड, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी बिराजदार यांच्या समाजिक आणि राजकीय कामाची दखल घेऊन लातूर जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. 
           
या निवडीबद्दल सागर बिरादार यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. आजपर्यंत केलेल्या कामाची दखल पक्षाने घेतल्यामुळे एक सच्च्या कार्यसकर्त्याला न्याय मिळाला अशी भावना सागर बिरादार यांनी व्यक्त केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News