फिल्म फेस्टिव्हलसाठी मराठी, गुजराती चित्रपटांची निवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 June 2020
  • या महोत्सवात 25 जूनला "माई घाट' या चित्रपटाचा प्रीमियर होईल.

मुंबई  : फ्रान्समधील प्रतिष्ठेच्या कान फिल्म फेस्टिव्हलसाठी भारत सरकारने "माई घाट- क्राईम ' या मराठी आणि "हॅल्लारो' या गुजराती चित्रपटाची निवड केली आहे. हे चित्रपट मार्केट विभागात दाखवले जातील. या वेळी सरकारने प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना प्राधान्य दिले आहे.

सध्या कोरोना महामारीमुळे सर्व चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. फ्रान्समधील कान चित्रपट महोत्सव मे महिन्यात होणार होता. हिंदीतील काही कलाकारांनी फेब्रुवारीतच तेथे जाण्याचा विचार केला होता; परंतु कोरोनामुळे त्यांना हा बेत रद्द करावा लागला. त्यानंतर तहकूब केलेला कान फिल्म फेस्टिव्हल आता ऑनलाईन होत आहे. या महोत्सवात 25 जूनला "माई घाट' या चित्रपटाचा प्रीमियर होईल. हा चित्रपट अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केला आहे. एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटात उषा जाधव हिने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

इफ्फीचे पोस्टर प्रकाशित

भारत सरकारतर्फे गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदाही नोव्हेंबरमध्येच होणार आहे. या चित्रपट महोत्सवाचे पोस्टर आणि पुस्तिकेचे प्रकाशन मंगळवारी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. नोव्हेबरच्या शेवटच्या आठवड्यात 51 इफ्फी महोत्सव होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News