मित्राला वाचवण्यासाठी ३ वर्षाच्या मुलाने काय केले पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 August 2020

मित्राला वाचवण्यासाठी ३ वर्षाच्या मुलाने काय केले पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल

मित्राला वाचवण्यासाठी ३ वर्षाच्या मुलाने काय केले पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई - कोरोनाच्या काळात अनेकांनी एकामेकाला मदतीचा हात दिल्याचे आपण पाहिले, पण एका चिमुकल्याने केलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की नेमकं काय केलंय चिमुरड्यानं, पाहा व्हिडिओमध्ये...

 

तुमच्या मोबाईलमध्ये सुध्दा हा व्हिडीओ आला असेल कदाचित, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये स्विमिंगपूल जवळ खेळत असलेल्या दोन मुलांपैकी एकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडतो. त्याला वाचवण्यासाठी दुसरा जीवाची बाजी लावतो. विशेष म्हणजे हा व्हिडीओ १७ ऑगस्ट रोजी त्यांच्या आईने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्विमिंगपूल शेजारी मुलांना खेळायला सोडणा-या पालकांनी नक्की हा व्हिडीओ पाहावा, मित्र पाण्यात पडल्यानंतर त्याने त्याला वाचवण्यासाठी केलेल्या धाडसाचं सर्वांनी कौतुक केलं आहे. ही घटना ब्राझीलच्या रिओ दि जानेरो मधील इटपरुनाची आहे. मुलाची आई पोलियाना कन्सोल डी ऑलिव्हिएरा यांनी हा व्हिडीओ फेसबुकवरती शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना मुलाच्या आईने तेथील संपुर्ण माहिती आणि घटना कशी घडली त्याची माहिती दिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News