पाहा 'विजेता' टीझर : ‘महाराष्ट्राची ताकद नाही तर उमेद कमी पडतेय....'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 February 2020

अभिनेता सुबोध भावे आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी नेहमीच काहीतरी वेगळं घेऊन येत असतो. अलीकडेच त्याची 'तुला पाहते रे'ही  मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.  आपल्या आव्हानात्मक  भूमिकांमुळे सुबोध भावे नेहमीच चर्चेत असतो. त्याने आपल्या अभिनय कौशल्याने कलाविश्वात वेगळाच ठसा उमटविला आहे.

अभिनेता सुबोध भावे आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी नेहमीच काहीतरी वेगळं घेऊन येत असतो. अलीकडेच त्याची 'तुला पाहते रे'ही  मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.  आपल्या आव्हानात्मक  भूमिकांमुळे सुबोध भावे नेहमीच चर्चेत असतो. त्याने आपल्या अभिनय कौशल्याने कलाविश्वात वेगळाच ठसा उमटविला आहे. सुबोध भावेचे चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते.  सध्या सुबोधने विजेता आणि भयभीत असे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच विजेता या चित्रपटाचा टीझर रिलीझ झाला असून त्याला प्रेक्षकांकडून अधिकाधिक पसंती दिली जात आहे.  या टीझरमध्ये सुबोध भावेच्या दमदार आवाजातील ‘महाराष्ट्राची ताकद नाही तर उमेद कमी पडतेय’ असे काही डायलॉग  प्रेक्षकांच्या मनाला गवसणी घालत आहेत.  

अमोल शेटगे दिग्दर्शित विजेता हा चित्रपट महाराष्ट्राने क्रीडा क्षेत्रात किती महत्वाचं योगदान केलं आहे याची महती सांगणारा आहे. सुबोध भावे, सुशांत शेलार, पूजा सावंत न्वी किशोर दिप्ती धोत्रे, प्रितम कागणे, मानसी कुलकर्णी, माधव देवचक्के अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट येत्या १२ मार्चला रिलीझ होणार असून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

अरिजित सिंहच्या आवाजातलं, मंत्रमुग्ध करणारं गाणं - 'सलते'... येत आहे उद्या.. #Salte Song Out Tomorrow #Bhaybheet #28Feb2020 @bhaybheetfilm An Actual Movies Productions @actualmovies Brown Sack Films Pvt Ltd @brownsackfilms Singer - @arijitsingh Music - @Nakash Aziz Lyricist - #mandarcholkar Music On : @zeemusicmarathi Directed by : @deepak.naidu.dee Produced by: @shanker_rohra39 | #DeepakNaraini @SubodhBhave | @Madhhuis | @PoorvaGokhale | @joshigirija | #MrunalJadhav @avinash.rohra | @pawkatariya | @dj_thestoryteller | @rajshrimarathi | @mediaone_pr | @vizualjunkies | @pickleentertainmentandmediapvt | @vizualjunkies

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News