विषय - तान्हाजी सिनेमा पाहाण्यासाठी सुट्टी मिळणेबाबत; शिक्षणांना अर्ज

यिनबझ टीम
Saturday, 18 January 2020

इतिहासातील शुरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल आमच्या पाठ्यपुस्तकात खूप कमी माहिती आहे,  त्यांच्याबद्द्ल अधिक माहिती मिळाण्यासाठी हा चित्रपट पाहाण्याची परवाणगी मिळावी, या आशयाचे हे पत्र लिहले आहे.

नाशिक - सध्या तान्हाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटाची क्रेझ मोठ्याप्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यातच एका विद्यार्थ्याने हा चित्रपट पाहाण्यासाठी चक्क आपल्या शाळेच्या मुख्याधपाकांनाच अर्ज लिहला आहे. इतिहासातील शुरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल आमच्या पाठ्यपुस्तकात खूप कमी माहिती आहे,  त्यांच्याबद्द्ल अधिक माहिती मिळाण्यासाठी हा चित्रपट पाहाण्याची परवाणगी मिळावी, या आशयाचे हे पत्र लिहले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या बाल-संस्कार सेमी इंग्लिश स्कुल, फरंजगव्हाण येथील एका विद्यार्थ्याने हा अर्ज लिहला आहे. भावेश पापालाल राहाड असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. चक्क आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना सुट्टी मिळण्यासाठी हा अर्ज लिहल्याने त्याची चांगलीच चर्चा होत आहे.

पत्रातील मजकूर असा आहे...
महोदय,
इतिहासातील शुरवीर, ज्यांच्याबद्दल आम्हाला पुस्त्कात खूप कमी प्रमाणात माहिती आहे, अशा महाराष्ट्रातल्या मातीतीत योध्दा नरवीर तान्हाजी मालुसरे यांची आधिक माहिती मिळण्यासाठी त्यांच्यावर आधारित सिनेमा पाहाण्यासाठी एक दिवसाची रजा मिळावी, ही नम्रविनंती.

अशा आशयामध्ये लिहलेल्या अर्जावरती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनीही पर्मिशन ग्रॅंटेडची मोहर उमटवली आहे. सध्या हा रजाअर्ज मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून तानाजी चित्रपटाची क्रेझदेखील विद्यार्थ्यांमध्ये कितीप्रमाणात आहे, हे यावरून दिसून येते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News