या संकेतस्थळावरती पाहा, दहावीचा निकाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020

या संकेतस्थळावरती पाहा निकाल
mahresults.nic.in
maharashtraeducation.com
results.mkcl.org
mahahsscboard.maharashtra.gov.in

या संकेतस्थळावरती पाहा, दहावीचा निकाल 

महाराष्ट्र - कोरोनामुळे यंदाचा दहावीचा निकाल जाहीर करण्यास उशीर झाला आहे, त्यात बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालकांचे संपुर्ण लक्ष निकालाकडे लागले होते. पण विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतिक्षा आज दुपारी १ संपण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेकडून आज दहावीच्या निकालाच्या तारखेची घोषणा अद्याप केलेली नाही. त्याबरोबर निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. 

 राज्यातील १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली होती. ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थीनी होत्या, तर ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी होते. दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात आली होती. पण कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आणि परीक्षा रद्द करावी लागली. कोरोनाची परिस्थिती पाहून अखेऱ राज्य सरकारने भूगोलाचा पेपर रद्द केला. तसेच विद्यार्थ्यांना इतर विषयाच्या गुणानुसार भूगोल विषयाला मार्क मिळतील. 

या संकेतस्थळावरती पाहा निकाल
mahresults.nic.in
maharashtraeducation.com
results.mkcl.org
mahahsscboard.maharashtra.gov.in

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News