पाहा, खासदार नवनीत आणि रवि राणांचं रामदेव बाबांच्या आश्रमापासून रंगलेलं प्रेम...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहेत. रवी राणा हे विधानसभेवर अपक्ष म्हणून २ वेळा निवडून आले होते, तर त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा २०१९ च्या लोकसभा निवडणुकी मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्या. त्यांचा खासदार होण्यामागे त्यांच्या पतीचा हात आहे असं म्हणावं लागेल. कारण जेव्हा पाहिजे तेव्हा रवी राणा यांनी त्यांच्या पत्नीला मदत केली आहे. तर जाणून घेऊया त्यांच्या रंजक प्रेम कहाणी बद्दल... 

नवनीत कौर राणा यांच्या विषयी... 
३ जानेवारी १९८६ रोजी मुंबईत जन्मलेल्या नवनीत कौर यांचा जन्म एका पंजाबी कुटुंब मध्ये झाला. त्यांचे वडील आर्मी ऑफिसर आहेत. १२ वि पास झाल्यांनतर राणा या मॉडेलिंग कडे वळल्या. सुरुवातीला अनेक तेलगू चित्रपटांमध्ये कामे केली. यांनतर पंजाबी भाषेतील  व इतर भाषेतील चित्रपटांमध्ये कामे केली आहेत

रामदेव बाबांच्या आश्रमात झाले प्रेम... 

रामदेव बाबांचा योगा भारत देशासह जगभरात खूप प्रसिद्ध आहे. रामदेव बाबाना भारतामध्ये योगगुरू म्हणून संबोधले जाते. ज्या प्रकारे सर्व रामदेव बाबांचे चाहते आहेत त्यांपैकीच एक म्हणजे आमदार रवी राणा. रवी राणा यांना योगाची प्रचंड आवड आहे. ते रामदेव बाबांना मानायचे, म्हणून ते रामदेव बाबांच्या आश्रमात शिबिराला जायचे. नवनीत कौर यांनाही योगाची आवड होती त्यामुळे त्याही योगाला याच आश्रमात यायच्या. इथेच एका शिबिरामध्ये या दोघांचीही भेट झाली होती. यांनतर रामदेव बाबांच्या परवानगीने या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 

सामूहिक विवाह सोहळ्यत झाले लग्न
रवी राणा आणि नवनीत कौर यांनी २ फेब्रुवारी २०११ रोजी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ३१६२ जोडप्यांचा विवाह झाला होता. सर्व जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू रामदेव बाबा, सहारा समूहाचे सुब्रता रॉय, अभिनेता विवेक ओबेरॉय सह अनेक दिग्गज उपस्थित होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News