देवगिरी / दौलताबाद किल्लाचे रहस्य...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 July 2020

देवगिरी म्हणजे ‘देवतांचा पर्वत’. औरंगाबाद शहराच्या ईशान्येस सुमारे १४ किलोमीटरवर वेरूळच्या रस्त्यावर एका शंकाकार डोंगरावर; १० कि.मी. परीघ असलेल्या तटबंदीच्या आत किल्ला आणि गाव आहे.

देवगिरी म्हणजे ‘देवतांचा पर्वत’. औरंगाबाद शहराच्या ईशान्येस सुमारे १४ किलोमीटरवर वेरूळच्या रस्त्यावर एका शंकाकार डोंगरावर; १० कि.मी. परीघ असलेल्या तटबंदीच्या आत किल्ला आणि गाव आहे. त्याची उंची पायथ्याच्या पठारापासून २२१ मीटर आहे. महंमद-बीन-तुघलक ह्याने त्याचे दौलताबाद असे नामांतर केले. यादव राजवंशाने ह्या किल्ल्याचे निर्माण केले. ह्या काळात यादव साम्राज्य समृध्दी आणि उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर होते. 

त्याची खबर उलाउद्दीन खिलजीला लागली आणि त्याने देवगिरी हल्ला केला. हा मुस्लिमांचा दक्षिणेवरचा पहिला हल्ला. हा हल्ला धरून एकूण ३ हल्ले झाले देवगिरीवर. त्यात अनुक्रमे रामदेवराय, शंकरदेव आणि हरपालदेव ह्यांचा पराभव होउन देवगिरी मुस्लिम शासन सुरू झाले. एके काळी काही काळ ह्या किल्ल्याने भारताची राजधानी व्हायचा मानही मिरवलाय. पेशवाईतील २ वर्षे सोडता हा किल्ला आणि आजुबाजुचा प्रदेश पुर्णकाळ मुस्लिम शासकांच्या ताब्यात होता. ह्या किल्ल्याची रचना इतकी अभेद्य केली आहे की, हा किल्ला अपराजित आहे. ह्यावर जो कब्जा मिळवला गेला तो फत्त्क कपट कारस्थानं आणि फंदफितुरीने. 

इतिहास :-

देवगिरी किल्ल्याचा प्राचीन इतिहास निश्र्चित नाही. परंतु हेमाद्रीच्या मते, पाचवा भिल्लम यादव याने १८७ मध्ये या डोंगरावर किल्ला बांधून तेथे यादवांची राजधानी केली. अलाउदीन खल्जीने १२९४ मध्ये हा किल्ला घेतला आणि खंडणी मान्य झाल्यावर रामचंद्र यादव यास परत दिला. पुढे यादवांनी खंडणी बंद करताच मलिक काफूरने १३०७, १३१० आणि अखेरच्या हरपालदेव यादवास फाशी दिली. 

महमहद तुघलकाने १३३७ साली त्याचे नाव यादवांच्या तेथील विपुल संपत्तीमुळे दौलताबाद ठेवले. दिल्लीहून राजधानी दौलताबादेस आणण्याचा प्रयत्न झाला. १३४७ मध्ये तो किल्ला बहमनी सत्तेखाली गेला आणि १५०० नंतर अहमद निजामशाहने तो आपल्या अंमलाखाली आणला. त्यांची ती राजधानीच होती. पुढे शाहजहानने चार महिन्यांच्या वेढ्यानंतर १६३३ मध्ये घेतला आणि अखेर १७२४ मध्ये किल्ला निजामाच्या सत्तेखाली आला. वास्तुशास्त्र दृष्ट्या येथील किल्ला वैशिष्ट्यपूर्ण असून त्याला सात (काहींच्या मते आठ) दरवाजे होते; पण त्यांपैकी मक्का आणि रोझा या नावाचे दोनच आता उपयोगात आहेत. 

किल्ल्याच्या सभोवती खंदक खणलेले असून त्यांवरील साकव अशा रीतीने बांधले होते की, शत्रू आला असता खंदाकातील पाण्याची पातळी कमीजास्त होई आणि हे साकव पाण्याखाली जात. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे. दरवाज्याच्या पायऱ्या खडकात खोदल्या असून किल्ल्यात अनेक गुप्त मार्ग, दरवाजे आणि संरक्षणासाठी बांधलेल्या शेकडो खोल्या आहेत. अगदी वरच्या खोल्यांत जाण्यासाठी पूर्वी चामड्याची शिडी वापरत असे इब्न बतूताने लिहिले आहे. 

त्याने १३४० मध्ये किल्ल्यास भेट दिली होती. बाहेरील तटाच्या आत काही अंतरावर आणखी दोन तट असून डोंगराच्या कडा इतक्या तासून गुळागुळीत केल्या आहेत की, त्यावरून वर चढणे अशक्य होते. सर्वात उंचीवर असणाऱ्या भागास कटक किंवा महाकोट म्हणतात, तर खालच्या भागास बालाकोट म्हणतात. किल्ल्यात अनेक इमारती आहेत. त्यांपैकी शंक्वाकार बुरूज, चांद मिनार, नगारखाना, चिनी महाल या प्रसिध्द असून अनेक मशिदी आणि मंदिरेही आहेत. 

आज प्रवाशांचे ते एक पर्यटन केंद्र बनले आहे. युध्दापध्दती आणि युध्दकलेतील गरजांच्या फेरबदलांना अनुसरून या किल्ल्याची रचना आणि बांधणीही वेळोवेळी होत गेली असवी. यासाठी दौलताबादचा किल्ला सैन्यवास्तुकलेतील प्रगतीचे प्रतिक म्हणून गणला जातो. हा किल्ल्याचा नकाशा, भिंती आणि प्रवेशव्दाराची रचना अशी योजनाबध्द रीतीने करण्यात आलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रूसैन्याच्या सहज प्रवेशाला थोपवून धरतात. तर उंच, उंच भिंती किल्लेबंदी करणाऱ्या उरतात. 

संपूर्ण किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची गाढण्यासाठी डोंगर पोखरून तयार करण्यात आलेल्या दुर्गम अतिसुरक्षित असे अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते की, शत्रूची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी. पाहण्यासारखी ठिकाणे किल्ल्याच्या एका बाजूला दहा कि.मी. भिंत पसरेली आहे. किल्ल्यात प्रवेश करतांना एक महादरवाजा आहे, या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदाक खिळे ठोकण्यात आलेली आहेत. यातून प्रवेश केल्यावर प्रत्येक गल्लीत पहारेकऱ्यांच्या कोठड्या बांधण्यातमुख्य महादरवाज्यातून आत आल्यावर बऱ्याच तोफा मांडून ठेवल्या आहेत. भारतमाता मंदिर आतमध्ये एक मंदिर आहे जे यादवकालीन जैन मंदिर होते. येथे कुतबुद्दीन खिलजी ने मस्जिद बनवली. जेव्हा १९४८ साली हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले तेव्हा त्या तिथे भारतमातेची मुर्ती स्थापन केली आणि ते ठिकाण भारतमाता मंदिर म्हणून प्रसिध्दीस आले. 

चाँद मिनार भारमाता मंदिराजवळ एक मोठा ३ मजली मिनार आहे. हे मंदिर तोडून तिथे मस्जिद बांधली असल्यामुळे अहमदशहा बहामनीने हा उत्तुंग मिनार त्यावेळेच्या मशिदीजवळ बांधला. दिल्लीच्या कुतुबमिनार नंतर उंच मिनारांमध्ये ह्या ३ मजली चाँद मिनारचा दुसरा क्रमांक लागतो. चिनी महल एके काळी ह्या महालाच्या भिंती चिनी मातीच्या नक्षीकामानी अलंकृत केल्या होत्या. ह्या महालाचा कारागृह म्हणून वापर केला जात असे. औरंगजेबाने ह्या महालात संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई आणि पुत्र शाहुराजे ह्यांना कैद करून ठेवले होते अशी वंदता आहे. तसेच, औरंगजबाने गोलकोंडाचा अंतिम राजा सुल्तान आबूल हुसैन तानाशाह आणि विजापुरचा अंतिम शासक सुल्तान सिकंदर यांना इथेच कैदेत ठेवलेले होते.

रंग महाल येथून डावीकडे एक लहानश्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर रंगमहालाचे भग्नावशेष सापडतात विभिन्न खोल्या आणि महालाच्या सुनियोजित बांधणीव्यतिरिक्त यातील खांब आणि खणामधील लाकडांवर केलेलं नक्षीकाम पर्यटकांना गतवैभावाची आठवण करून देतात. मेंढा तोफ चिनी महालापासून जवळच एका बुरूजावर ही मेंढा तोफ आहे. चारही दिशांना फिरू शकणाऱ्या ह्या तोफेला मागच्या बाजुला मेंढ्याचे तोंड आहे त्यामुळे ह्या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले. 

मुस्लिम शासक हिला ‘तोप किला शिकन’ म्हणजे ‘किल्ला तोडणारी तोफ’ म्हणत. ह्या तोफेवर ही तोफ तयार करणाऱ्याचे मुहमद-हुसेन अमल-ए-अरब आणि औरंगजेबाचे नाव कोरले आहे. ह्या तोफेच्या तोंडावर कुराणातील एक वचन कोरले आहे. खंदक मेंढा तोफेच्या बुरुजावरून पुर्ण किल्ल्याचे दर्शन करता येते. आणि किल्ल्यात जाण्याच्या मार्गात एक मोठा खंदक आहे. ह्या खंदकात दोन स्तर आहेत. ह्या दोन्ही स्तरांमध्ये पाणी भरलेले असायचे. नेहमीच्या वेळी फत्त्क खालचा स्तर भरून पाणी असायचे. त्याने किल्ल्यात जा-ये करण्यासाठई असलेला पुल उघड असायचा.

हल्ल्याच्या वेळी पाणी दुसऱ्या स्तरात सोडले जायचे जेणेकरून पुल पाण्याखाली जाउन शत्रू खंदकात पडून खंदकातील मगरींच्या भक्षस्थानी पडायचा. ह्या खंदकातील भिंती विशिष्ट पध्दतीने बांधल्या होत्या ज्याने त्यावर शिडी लावणे अशक्य होते. अंधारी / भुलभुलय्या हा भुलभुलय्या ह्या किल्ल्याच्या अभेद्य रचनेचा कळस आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी हा भुलभुलय्या पार करावा लागतो. ह्याचे प्रवेशव्दार एखाद्या गुहेसारखे आहे. ह्याचे प्रवेशव्दार एखाद्या गुहेसारखे आहे. आणि हा पुर्ण मार्ग एकदम अंधारी आहे. अक्षरश: काळोख. काहीही दिसत नाही. 

भुलभुलय्या अशासाठी म्हणतात की, हा पुर्ण मार्ग वर्तुळाकार जिन्याने बनलेला आहे. पायरी मधील अंतर विषम आहे. एक पायरी एकदम उंच तर एक पायरी एकदम लहान. शत्रूला उल्लु बनवण्याची फुल तजवीज आहे. हवा आणि प्रकाश येण्यासाठी काही झरोके आहेत. त्यात शत्रुने प्रवेश केला रे केला की, तो सरळ खंदकात पोहोचलाच पाहिजे अशी सोय केलेली आहे. शत्रू जरा विचार करत थांबला की, वरून दगडांचा मारा करायला छुप्या जागा बनवलेल्या आहेत. बारादारी सध्याला ह्या किल्ल्यावर चांगल्या स्थितीत असणारी ही एकच वास्तु आहे. शहाजहानने बनवलेला हा महाल अष्टकोनी आहे. 

ह्याच्या बाहेरच्या बाजूला १२ कमानी आहेत त्याने ह्याचे नाव बारादरी असे पडले. इथे अष्टकोणी खोल्या आणि या खोल्यांची छत घुमटाकृती आहेत. बारादरीवरून पुर्ण किल्ल्याचे आणि आजुबाजुच्या परिसराचे सुंदर असे विहंगम दुश्य दिसते. एकनाथांचे गुरू आणि किल्ल्याचे किल्लेदार जनार्धनस्वामी इथे निवास करीत असे म्हणतात. राजकारण आणि युध्दानी त्रासलेल्या सामान्य जनतेस ते उपदेश, मार्गदर्शन करीत. किल्लेदार असुनही त्यांनी धार्मिक जीवनाची कास धरली संसारात अटकलेल्यांना आणि अध्यात्माची कास धरणाऱ्यां सर्व धर्मियांना ही एक हक्काची जागा तेव्हा वाटत असावी. याच गुहेत दोन भाग आहेत.

एकीकडे अखंड प्रवाह असलेली जलधारा इथे आहे, मोतीटाका हे जलाशयाचे नाव अत्युच्च शिखर हा ह्या किल्ल्यावरील अत्त्युच्च बुरूज. इथे एक मोठी तोफ आहे जीचे नाव आहे दुर्गा तोफ. एवढी वजनदार आणि भव्य तोफ इथे कशी आणली असेल वाटून उगाच जीव दडपून जातो. 

राहण्याची सोय :- किल्ल्यावर राहण्याची सोय नाही पण औरंगाबाद मध्ये होऊ शकते.

जेवण्याची सोय :- किल्ल्यावर जेवणाची सोय नाही पण किल्ल्याच्या समोर हॉटेल आहेत.

पाण्याची सोय :- गडावर पिण्यायोग्य पाणी नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News